महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

शर्वरी वाघ, अभय वर्मा आणि मोना सिंग स्टारर चित्रपट 'मुंज्या' केलं जबरदस्त कलेक्शन - munjya box office collection day 1 - MUNJYA BOX OFFICE COLLECTION DAY 1

Munjya box office collection : शर्वरी वाघ आणि अभय वर्मा अभिनीत कॉमेडी 'मुंज्या'नं रिलीजच्या पहिल्या दिवशी धमाकेदार कमाई केली आहे. या चित्रपटानं मनोज बाजपेयी स्टारर 'भैया जी' आणि राजकुमार राव आणि जान्हवी कपूरच्या 'मिस्टर अ‍ॅन्ड मिसेस माही'ला कमाईबाबतीत मागे टाकले आहे.

Munjya box office collection
मुंज्या बॉक्स ऑफिस कलेक्शन (फोटो - IANS)

By ETV Bharat Marathi Team

Published : Jun 8, 2024, 4:05 PM IST

मुंबई - Munjya box office collection :अभिनेत्री शर्वरी वाघ आणि अभय वर्मा स्टारर हॉरर कॉमेडी 'मुंज्या' या 7 जून रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित झाला. रिलीज होताच या चित्रपटाला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळत आहे. चित्रपटाचे पोस्टर आणि ट्रेलर आधीपासूनच प्रेक्षकांमध्ये चर्चेत होते. आता चित्रपटाच्या पहिल्या दिवसाच्या कलेक्शनचे आकडेवारी समोर आली आहेत. मुंज्यानं पहिल्याच दिवशी अपेक्षेपेक्षा जास्त कमाई केली आहे. हा चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे आणि त्याला उदंड प्रतिसाद मिळत आहे. आदित्य सरपोतदार दिग्दर्शित 'मुंज्या'मध्ये शर्वरी वाघ, अभय वर्मा यांच्या व्यतिरिक्त मोना सिंग मुख्य भूमिकेत आहेत.

पहिल्या दिवशी 'मुंज्या'ची कमाई :चित्रपटाच्या पहिल्या दिवसाच्या कलेक्शनबद्दल बोलायचं झालं तर, इंडस्ट्री ट्रॅकर सॅकनिल्कच्या रिपोर्टनुसार 'मुंज्या'नं रिलीजच्या पहिल्या दिवशी तब्बल 3.75 कोटी रुपयांची कमाई केली आहे. शुक्रवारी, सकाळच्या शोची व्याप्ती 10 टक्के होती. तर संध्याकाळच्या आणि रात्रीच्या शोची व्याप्ती 20 आणि 37 टक्क्यांहून अधिक झाली होती. 'मुंज्या' हा एक हॉरर-कॉमेडी चित्रपट आहे. या चित्रपटाची कहाणी पुणे आणि कोकणभोवती फिरणारी आहे. या चित्रपटामध्ये अभय वर्मानं बिट्टूची भूमिका साकारली आहे. तर मोना सिंगनं त्याच्या आईची भूमिका केली आहे.

शर्वरी वाघवर कौतुकचा वर्षाव : या चित्रपटाला प्रेक्षकांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत असल्यानंतर अनेकजण पोस्ट शेअर करून शर्वरी वाघचं कौतुक करत आहेत. या चित्रपटानं कमाईच्या बाबतीत मनोज बाजपेयी स्टारर 'भैया जी' आणि राजकुमार राव-जान्हवी कपूरच्या 'मिस्टर अ‍ॅन्ड मिसेस माही'ला मागे टाकले आहे. 'मुंज्या'नं दोन्ही चित्रपटांना ओपनिंग कलेक्शन मागे टाकलं आहे. अलीकडेच शर्वरी वाघचा कथित बॉयफ्रेंड आणि अभिनेता सनी कौशलनेही या चित्रपटाचे कौतुक केले होते. या चित्रपटाचे पोस्टर सोशल मीडियावर शेअर करताना सनीनं शर्वरीच्या कामाचे खूप कौतुक केलं होतं. हा चित्रपट शनिवारी आणि रविवारी बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करेली अशी अशा अनेकजण करत आहेत.

हेही वाचा :

  1. 'मी अभिनेता होणे ही रामोजी रावांचीच कृपा', रितेश देशमुखचं विधान, तर "मार्गदर्शक गुरू हरपल्याचं" रजनीकांतचं ट्विट - Ramoji Rao Passes Away
  2. रामोजी राव खऱ्या अर्थानं भारतरत्न, सर्वोच्च उपाधी प्रदान करणे हीच त्यांना श्रद्धांजली - एस. एस. राजमौली - ramoji rao passed away
  3. सुधा चंद्रन, रितेश देशमुख ते भरत जाधव यांच्यापर्यंत दिग्गज स्टार्सना लॉन्च करणारे रामोजी राव - Ramoji Rao

ABOUT THE AUTHOR

...view details