मुंबई Shah Rukh Khan Meets Deepika Padukone : बॉलिवूड अभिनेता शाहरुख खाननं 12 सप्टेंबर रोजी रात्री उशिरा मुंबईतील एचएन रिलायन्स फाऊंडेशन रुग्णालयात दीपिका पदुकोण आणि तिच्या नवजात बालिकेची बाळाची भेट घेतली. अलीकडेच दीपिका आणि पती रणवीर सिंगनं त्यांचं पहिलं, कन्यारत्नाचं स्वागत केलं. शाहरुख खानच्या आधी मुकेश अंबानी यांनी नवजात बालिकेची भेट घेतली होती. गेल्या गुरुवारी पापाराझींनी शाहरुख खानची कार एचएन रिलायन्स फाउंडेशन हॉस्पिटलबाहेर पाहिली. शाहरुखनं आपल्या व्यग्र शेड्यूलमधून बाळाला भेटण्यासाठी वेळ काढला.
शाहरुख खाननं घेतली दीपिकाच्या बाळाची भेट :व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये 'किंग खान'नं त्याच्या कारच्या चारही बाजूंनी पडदे लावले. आता सोशल मीडियावर शाहरुख जातानाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या व्हिडिओवर अनेकजण कमेंट्स करत आहेत. एका चाहत्यानं या व्हिडिओवर लिहिलं, "दीपिकाची नॉर्मल डिलिव्हरी झाली आहे का?" दुसऱ्या एकानं लिहिलं, "दीपिका किती दिवसांपासून रुग्णालयात आहे, सर्व ठीक आहे का ?" आणखी एकानं लिहिलं, "खूप चांगला मित्र आणि व्यक्ती आहे." याशिवाय काहीजण या पोस्टवर हार्ट आणि फायर इमोजी पोस्ट करून शाहरुखवर प्रेमाचा वर्षाव करताना दिसत आहेत. रिपोर्ट्सनुसार, दीपिकाला तिच्या छोट्या राजकुमारीसह लवकरच रुग्णालयातून डिस्चार्ज मिळणार आहे. रणवीर आपल्या पत्नी आणि मुलीचं घरी भव्य स्वागत करण्याच्या तयारीत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हे जोडपं त्यांच्या मुलासाठी नो-फोटो धोरणांचं पालन करतील.