मुंबई- Farah Khan Mother Demise :बॉलिवूडची प्रसिद्ध कोरिओग्राफर फराह खानची आई मनेका इराणी यांचं 26 जुलै रोजी दीर्घ आजारानं निधन झालं. दरम्यान कालपासून सेलेब्स फराह खानच्या घरी तिच्या आईला श्रद्धांजली वाहण्यासाठी पोहोचत आहेत. यामध्ये सलमान खानचे वडील सलीम खान, राणी मुखर्जी, संजय कपूर, इब्राहिम अली खान, फरदीन खान यांच्यासह अनेक हे स्टार्स फराहचं सांत्वन देण्यासाठी गेले होते. काल रात्री बॉलिवूड स्टार शाहरुख खान, त्याची पत्नी गौरी खान आणि मुलगी सुहाना खानबरोबर फराहच्या घरी गेला होता. आता काही व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. यामध्ये 'किंग खान' हा फराहच्या घरातून कारच्या दिशेनं जाताना दिसत आहे. या व्हिडिओमध्ये सुहाना खान आणि फराह खानची देखील झलक दिसली आहे.
शाहरुख खाननं आपल्या कुटुंबासह फराह खानची आई मेनका इराणी यांना वाहिली श्रद्धांजली, व्हिडिओ व्हायरल - Farah Khan Mother death - FARAH KHAN MOTHER DEATH
Farah Khan Mother Demise : फराह खानची आई मेनका इराणी यांचं निधन झालं आहे. त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी शाहरुख खान हा आपल्या कुटुंबासह फराहच्या घरी पोहचला.
Published : Jul 27, 2024, 11:33 AM IST
फराह खानच्या घरी शाहरुख खान : व्हायरल व्हिडिओमध्ये खान कुटुंबीय अतिशय दु:खी दिसत होते. शाहरुख खान हा त्याची खास मैत्रीण फराह खानच्या आईवर खूप प्रेम करत होता. 'किंग खान' तिला लाडानं डिअर आंटी म्हणत होता. शाहरुख आणि फराह खाननं अनेकदा एकत्र काम केलंय. अनेकादा फराह खानच्या घरामधून जेवणाचा डब्बा देखील येत असल्याचं एका मुलाखतीत शाहरुखनं सांगितलं होतं. फराह आणि शाहरुखमध्ये मैत्रिचं घट्ट नात आहे. अनेकदा शाहरुख आणि फराह एकत्र बॉलिवूडमधील पार्ट्यामध्ये दिसतात. फराह तिच्या आईच्या खूप जवळ होती.
फराह आणि शाहरुखनं केलं 'या' चित्रपटांमध्ये एकत्र काम : फराहनं नुकताच तिच्या आईचा वाढदिवस साजरा केला होता. 12 जुलै रोजी फराहनं तिच्या आईचा 76वा वाढदिवस साजरा केला. वाढदिवस साजरा केल्यानंतर अवघ्या दोन आठवड्यांनंतर तिच्या आईचं निधन झालं. फराह खाननं शाहरुख खानबरोबर तिचा पहिला 'मैं हू ना' चित्रपट दिग्दर्शित केला होता. यानंतर 'ओम शांती' आणि नंतर 'हैप्पी न्यू ईयर' हे या जोडीचे तीन चित्रपट हिट ठरले. दरम्यान फराहच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर तिनं नुकतेच 'क्रू' या चित्रपटामधील कोरिओग्राफी केली होती. हा चित्रपट रुपेरी पडद्यावर हिट ठरला होता. या चित्रपटात तब्बू, करिना कपूर खान आणि क्रिती सेनॉन या मुख्य भूमिकेत दिसल्या होत्या.