महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

सारा अली खानची आई अमृता सिंगनं पापाराझींकडे पाहून लपवला चेहरा, व्हिडिओ व्हायरल - AMRITA SINGH

सारा अली खानची आई अमृता सिंगनं मुंबई विमातळावर पापाराझींकडे पाहून चेहरा लपवला. आता तिचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

Amrita singh
अमृता सिंग (amrita singh - instagram)

By ETV Bharat Entertainment Team

Published : Jan 3, 2025, 5:33 PM IST

Updated : Jan 3, 2025, 10:28 PM IST

मुंबई -बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खानची आई अमृता सिंग नुकतीच मुंबई विमातळावर स्पॉट झाली. विमातळावरून बाहेर आल्यानंतर तिला पापाराझींचा सामाना करावा लागला. अमृता सिंगनं पापाराझींना विमातळावर फोटो देखील क्लिक करू दिले नाहीत. दरम्यान सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हिडिओमध्ये अमृता सिंग विमातळावरून बाहेर पडताना दिसत आहे. यानंतर तिनं कॅमेरा पाहिल्यानंतर आपला चेहरा लपवला. तिनं कॅमेऱ्याकडे पाहणं देखील टाळलं आणि पटकन तिथून पळ काढला. आता अमृता सिंगच्या अचानक अशा वागण्यामुळे अनेकजण चकित होत आहेत.

अमृता सिंगच्या व्हिडिओवर दिल्या यूजर्सनं प्रतिक्रिया : हा व्हिडिओ यूजर्सनं पाहिल्यानंतर अनेकजण यावर आपल्या प्रतिक्रिया देत आहेत. एका यूजरनं या व्हिडिओवर लिहिलं, 'अमृता सिंग आपला चेहरा का लपवत आहे?' दुसऱ्या एकानं लिहिलं, 'मॅडम तुम्ही आता देखील खूप सुंदर दिसता आणि तुमची मुलगी पण देखणी आहे.' आणखी एकानं लिहिलं, 'साराच्या आईला काय झाले आहे? ' अनेकजण अमृता सिंग यांना पाठिंबा देत आहेत. याशिवाय काहीजण त्यांना ट्रोल देखील करत आहेत. व्हिडिओमध्ये अमृता सिंग लूज-फिटिंग मरून आणि काळ्या सूटमध्ये दिसत आहे. याशिवाय त्यांनी चेहऱ्यावर मोठा गडद चष्माही लावला आहे.

अमृता सिंगचं वर्कफ्रंट :अमृता सिंगनं व्हिडिओमध्ये पॅपला त्यांचे फोटो क्लिक न करण्यास सांगितलं. साराची आई अमृतानं 1983 मध्ये आलेल्या 'बेताब' चित्रपटातून सनी देओलबरोबर बॉलिवूडमध्ये डेब्यू केला होता. तिनं करिअरच्या सुरुवातीच्या काळात सैफ अली खानशी लग्न केलं. त्यांना दोन मुले आहेत, सारा अली खान आणि इब्राहिम अली खान. सारा अली खान सध्या बॉलिवूडमध्ये खूप सक्रिय असून ती मुख्य भूमिकेत पडद्यावर दिसते. दुसरीकडे इब्राहिम अली खान देखील लवकरच चित्रपटसृष्टीत पदार्पण करणार आहे. अमृता सिंग शेवटची 'हिरोपंती 2'मध्ये दिसली होती. याआधी तिनं '2 स्टेटस्'मध्ये काम केलं होतं. यामध्ये तिची भूमिका अनेकांना आवडली होती. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट ठरला होता.

हेही वाचा :

  1. सारा अली खाननं आई अमृता सिंग आणि प्रियजनांबरोबर केला वाढदिवस साजरा, फोटो व्हायरल - Sara Ali Khan birthday
  2. सारा अली खान आणि अमृता सिंग यांचा क्यूट इब्राहिम अली खानबरोबरचा फोटो व्हायरल, दिसली तैमूरची झलक - Sara Ali khan share pic
  3. सारा अली खानने आई अमृता सिंगच्या वाढदिवसानिमित्त लिहिली हृदयस्पर्शी पोस्ट
Last Updated : Jan 3, 2025, 10:28 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details