मुंबई: राजकुमार हिरानी यांचा 'मुन्नाभाई एमबीबीएस' चित्रपट आता देखील लोकांना खूप आवडतो. या चित्रपटामधील डायलॉग खूप हिट ठरले आहेत. 'मुन्नाभाई एमबीबीएस' हा चित्रपट फक्त डॉक्टर होण्याची कहाणी नाही, तर ती प्रेम, मैत्री, चुका सुधारणे आणि आयुष्यातील छोट्या-छोट्या क्षणांमध्ये आनंद घेणे यावर आधारित आहे. या चित्रपटामध्ये खूप चांगला सामाजिक संदेश दिला गेला आहे. 'मुन्नाभाई एमबीबीएस' चित्रपटात मुन्नाभाईच्या आनंदी आणि मन जिंकण्याच्या शैलीचे खूप चांगले वर्णन केले गेले आहे. वीस वर्षांनंतरही या चित्रपटातील मजेदार आणि वेगळे डायलॉग ताजे आणि खास वाटतात. 'मुन्नाभाई एमबीबीएस' चित्रपटानं प्रेक्षकांच्या मनात एक वेगळीच छाप सोडली आहे.
'मुन्नाभाई एमबीबीएस' चित्रपटामधील खास डायलॉग
1) ऐ मामू... जादू की झप्पी दे डाल और बात खत्म
2) जब तुम स्माइल करता है ना... तो ऐसा लगता है कि क्या मस्त लाइफ है
3) लाइफ में जब टाइम कम रहता है ना… डबल जीने का, डबल
4) ऐ चिली चिकन तेरा हाइट क्या है रे, हाऊ लॉन्ग हाऊ लॉन्ग ?
5) भाई ने बोला करने का मतलब करने का