मुंबई -अभिनेत्री समांथा रूथ प्रभूनं तिच्या अभिनयामुळे सर्वांची मनं जिंकली आहेत. ती सध्या नवीन वर्षाचा संकल्प कायम ठेवत आहे. समांथानं गुरुवारी 16 जानेवारी रोजी तिचा इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये ती जिममध्ये वेगवेगळ्या प्रकारचे व्यायाम करताना दिसत आहे. समांथाचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. व्हिडिओच्या सुरुवातीला समांथा बेडवर झोपल्याची दिसत आहे. यानंतर ती अचानक व्यायाम करताना दिसते. या व्हिडिओ पोस्टमध्ये तिनं लिहिलं, 'नवीन वर्ष सुरू होऊन दोन आठवडे झाले आहेत. तुमचे संकल्प आधीच तुटत आहेत का?' असं अनेक वेळा घडते. काही अपयशांमुळे कोणीही निराश होऊ नये. काही वाईट दिवस आले म्हणजे आपण बाहेर पडलो असं नाही. कधी आपण आराम करतो, कधी आपण गोष्टी ढकलतो, हे असंच घडतं.'
समांथा रूथ प्रभूच्या चाहत्यांना आवडला व्हिडिओ :व्हिडिओमध्ये समांथानं ऑलिव्ह ग्रीन स्पोर्ट्स ब्रा आणि योगा टाइट्स घातल्याचं दिसत आहे. यात ती खूप देखणी दिसत आहे. समांथा सध्या तिच्या दिनचर्येत उत्तम कामगिरी करत आहे. या व्हिडिओच्या माध्यामातून तिनं काही आरोग्यविषयक सल्ला चाहत्यांना दिला आहे. याशिवाय व्यायाम करण्याची प्रेरणाही तिनं चाहत्यांना दिली आहे. आता समांथाच्या या व्हिडिओवर एका चाहत्यानं लिहिलं, 'तू प्रत्येकांसाठी एक प्रेरणा आहे.' दुसऱ्या एकानं लिहिलं, 'चित्रपटसृष्टीतील सुंदर अभिनेत्री.' आणखी एकानं लिहिलं, 'सॅम आता पुन्हा परत येत आहे.' तसेच अनेकांनी या पोस्टवर फायर आणि हार्ट इमोजी शेअर केले आहेत.
साऊथनंतर बॉलिवूडमध्ये केला प्रवेश : समांथा रुथ प्रभूनं तिच्या करिअरची सुरुवात साऊथ चित्रपटसृष्टीपासून केली. तिनं चित्रपटसृष्टीत अनेक सुपरहिट चित्रपट दिली आहेत. समांथाच्या नावाची गणना टॉपच्या अभिनेत्रींमध्ये केली जाते. साऊथमध्ये फेम मिळाल्यानंतर समांथा बॉलिवूडकडे वळली. तिनं बॉलिवूडमध्ये अनेक चित्रपटांसाठी काम केलं आहे. गेल्या वर्षी, समांथानं वरुण धवनबरोबर 'सिटाडेल: हनी बनी' प्राइम व्हिडिओ सीरीजमध्ये काम केलं होतं. या सीरीजमध्ये समांथाच्या अभिनयाचे खूप कौतुक झाले होते. तिची ही सीरीज चाहत्यांना खूप आवडली होती. आता समांथा तिच्या आगामी चित्रपटांच्या तयारीत व्यग्र आहे.