ETV Bharat / entertainment

अजिंठा वेरूळ चित्रपट महोत्सवाला दिमाखदार सुरुवात, सई परंजपेंचा ‘पद्मपाणि जीवनगौरव पुरस्कारा’नं सन्मान - PADMAPANI AWARD TO SAI PARANJAPE

10 वा अजिंठा वेरूळ चित्रपट महोत्सवाला छत्रपती संभाजीनगरमध्ये दिमाखदार सुरुवात झाली. यावेळी सई परंजपेंचा ‘पद्मपाणि जीवनगौरव पुरस्कारा’नं सन्मान करण्यात आला.

Ajantha Ellora Film Festival
अजिंठा वेरूळ चित्रपट महोत्सवाला सुरुवात (Etv Bharat)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jan 16, 2025, 8:03 PM IST

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) - अजिंठा - वेरूळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातील उद्घाटन सोहळ्यात 'कालिया मर्दन' या चित्रपटानं 105 वर्षांनी पुन्हा प्रेक्षकांना भुरळ घातली. मोहत्सवाच्या पहिल्या दिवशी आगळ्या वेगळ्या पद्धतीने चित्रपट दाखवण्यात आला. यावेळी पहिल्या मुक चित्रपटाला लाईव्ह संगीत देण्यात आले. तर ‘पद्मपाणि जीवनगौरव पुरस्कार’ ज्येष्ठ दिग्दर्शिका सई परांजपे यांना देण्यात आला. यावेळी कुठलेही व्यावसायिक शिक्षण न घेता मला अनुभवातून इतका मोठा पल्ला गाठता आला याचा आनंद आहे. उशिरा का होईना माझा सन्मान झाला याबद्दल समाधान असल्याचं, त्यांनी यावेळी सांगितलं. तर अजिंठा लेणी अनेक चित्रपटांचे उगमस्थान असल्याचं मत दिग्दर्शक आशितोष गोवारीकर यांनी व्यक्त केलं.

कालिया मर्दन चित्रपटाने घातली भुरळ : भारतीय चित्रपटाचे जनक दादासाहेब फाळके यांनी तयार केलेल्या 'कालिया मर्दन' या पहिल्या मुक चित्रपटाने तब्बल 105 वर्षांनी पुन्हा एकदा प्रेक्षकांची मनं जिंकली. शंभर वर्षांपूर्वीचा मुकपट प्रत्यक्ष संगीताद्वारे रसिकांना अनुभवता यावा म्हणून 'कालिया मर्दन' हा मुकपट कोलकाता येथील 'सतब्दीर सब्द' या वाद्यवृंद समूहातर्फे सादरीकरणाद्वारे दाखवला गेला. या समूहामध्ये सात्यकी बॅनर्जी, सुचल चक्रवर्ती, तीर्थंकर बॅनर्जी, सुमंत्र गुहा, सौमाल्य सरेश्वरी, अरुणभा गुप्ता, दिव्यकमल मित्र आणि स्वरूप मुखर्जी आदि कलाकारांचा समावेश होता. त्याकाळी कुठलेही संवाद नसताना केवळ संगीताच्या जोरावर प्रेक्षकांना कथा सांगण्याची कला पाहून प्रेक्षक अवाक झाले. चित्रपट संपल्यावर सर्वांनी उभ राहून टाळ्या वाजवत दादासाहेब फाळके यांच्या कलेला दाद दिली.

अजिंठा वेरूळ चित्रपट महोत्सवाला सुरुवात (Etv Barat)

कामाची दखल घेतली यांचा आनंद : "आजवर मी केलेल्या कामाची उशिरा का होईना पण दखल घेतली आणि आज मला हा मोठा आणि सुंदर असा ‘पद्मपाणि जीवनगौरव पुरस्कार’ सन्मान देऊन केला, त्याचा मी अतिशय आनंदानं आणि नम्रपणे स्वीकार करते. अजिंठा वेरूळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव एका वेगळ्या धारणेनं सुरू झालेला असून मराठवाड्यामधल्या रसिकाला खास आपला वाटेल असा हा उत्सव आहे", अशी भावना पद्मभूषण सई परांजपे यांनी वक्तव्य केलं. आनंदाची गोष्ट अशी की, गेल्या वीस वर्षामध्ये मराठी सिनेमाला उभारी आली असून आज वर्षाला किमान 50 - 60 मराठी चित्रपट जन्माला येतात. विशेष म्हणजे त्यातील अनेक सिनेमे शहरी संस्कृतीपासून दूर असलेल्या मातीमधून निपजतात. होतकरू दिग्दर्शकाला वाटणारी तळमळ, खाजगी व्यथा, सामाजिक पोटतिडीक अशा जाणीवामधून यातल्या बऱ्याच सिनेमांचा जन्म होतो. त्यातले काहीतरी तांत्रिकदृष्ट्या थोडं कच्चे असले तरी आशयाला पक्के असल्यामुळे हे सिनेमे थेट भिडतात. पण या सिनेमंडीमधून नानाविध विषयांना वाचा फुटली असल्याचे पद्मभूषण सई परांजपे यांनी सांगितले.

सरकार तर्फे चित्रपटांना मदत : चित्रपट हे महत्त्वपूर्ण क्षेत्र असून भारतीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर सॉफ्ट पॉवर म्हणून सिनेमा काम करत असतो. महाराष्ट्रात आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव होत आहेत, ही निश्चितपणे आनंदाची बाब आहे. या माध्यमातून आपल्याला भारतीय सिनेमासह आंतरराष्ट्रीय चित्रपट पाहता येतात. अशा महोत्सवात सेलिब्रेटी, क्रिएटिव्हिटी आणि कॉमर्स हे तीन 'सी' यामध्ये महत्त्वपूर्ण भूमिका निभावत असतात. चित्रपट बनविणाऱ्या मंडळींना महाराष्ट्र शासन कायम सहकार्य करीत आले असून अनेक प्रोत्साहानपर योजना उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. दरवर्षी मराठी सिनेमाला महाराष्ट्र शासनाच्यावतीने 100 कोटी रुपयांचं अनुदान दिलं जातं. तर नवीन लेखकांसाठी व्यासपीठ तयार केलं असून त्यामुळे दिग्दर्शक आणि लेखक यांच्यात नवीन समन्वय निर्माण होण्यास मदत होईल, असं राज्याचे अपर मुख्य सचिव विकास खारगे यांनी सांगितले. तर महाराष्ट्रातील स्थळ चित्रीकरण करण्यासाठी मोफत देण्यात येत असल्याचं देखील त्यांनी सांगितले.

65 चित्रपटांची मेजवानी : अजिंठा वेरुळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे थाटात उद्घाटन करण्यात आले. पाच दिवस वेगवेगळ्या विषयांवर विविध भाषांमधे चित्रित 65 चित्रपटांची मेजवानी रसिकांना अनुभवता येणार आहे. त्याच बरोबर नव्या पिढीतील युवकांसाठी अभ्यासासाठी वेगवेगळे चर्चासत्र ठेवण्यात आले आहेत. ज्यामधे तांत्रिक अभ्यास आणि माहिती भावी कलावंतांना मिळणार आहे. ज्येष्ठ दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर यांचे मार्गदर्शन असणार आहे. समारोप करण्यासाठी फराह खान यांची उपस्थिती असणार आहे. त्यामुळे वेगळी पर्वणी प्रेक्षकांसाठी मराठवाड्यात असणार असून त्यांची व्याप्ती हळूहळू वाढणार असल्याचा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.