महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

अभिनेता सलमान खानच्या घराबाहेर दोन अज्ञातांचा गोळीबार, लॉरेन्स बिश्नोईच्या टोळीवर पोलिसांचा संशय - Salman Khan - SALMAN KHAN

Salman Khan : बॉलिवूड सुपरस्टार सलमान खानच्या घराबाहेर गोळीबार झाल्याचं समोर आलंय. यानंतर त्याच्या घराच्या परिसराची सुरक्षा वाढवण्यात आलीय.

Salman Khan
मोठी बातमी! बॉलिवूड सुपरस्टार सलमान खानच्या घराबाहेर गोळीबार

By ETV Bharat Marathi Team

Published : Apr 14, 2024, 8:02 AM IST

Updated : Apr 14, 2024, 11:11 AM IST

अभिनेता सलमान खानच्या घराबाहेर दोन अज्ञातांचा गोळीबार

मुंबई Salman Khan : बॉलिवूडचा अभिनेता सलमान खानला अनेकदा जीवे मारण्याच्या धमक्या आल्या आहेत. या धमक्यांनंतर सलमान खान नेहमीच कडक सुरक्षेत असतो. परंतु कडक सुरक्षा असूनही, आज पहाटे 4:50 वाजता दोन अज्ञात व्यक्तींनी अभिनेत्याच्या गॅलेक्सी अपार्टमेंटच्या बाहेर गोळीबार केला. त्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली.

परिसराची सुरक्षा वाढवली : मिळालेल्या माहितीनुसार, पहाटे 4:50 वाजता वांद्रे येथील सलमान खानच्या गॅलेक्सी अपार्टमेंटबाहेर दोन अज्ञात लोकांनी हवेत तीन ते चार राऊंड गोळीबार केला. दोन्ही गोळीबार दुचाकीवर आले. त्यांनी हवेत गोळीबार करुन त्यांनी तिथून पळ काढला. दोघांनी हेल्मेट घातलं होतं. त्यामुळं त्यांची ओळख पटू शकली नाही. या घटनेची माहिती मिळाताच गुन्हे शाखा आणि स्थानिक पोलिसांच्या पथकानं घटनास्थळी भेट दिली. मुंबई पोलिसांनी गोळीबाराची गंभीर दखल घेतली आहे. लॉरेन्स बिश्नोई तुरुंगात असला तरी त्याची टोळी बाहेर आहे. गोल्डी ब्रारही बाहेर असल्याचं पोलिसांचं म्हणणे आहे. अशा परिस्थितीत याच टोळीनं सलमानच्या घराबाहेर गोळीबार केल्याचा पोलिसांचा अंदाज आहेसलमान खानच्या बंगल्याबाहेर कोणी गोळीबार केला, याबाबत पोलिसांचा तपास सुरू आहे. मात्र सलमान खानला असलेला धोका लक्षात घेता त्याची सुरक्षा वाढवण्यात आलीय.

सलमानला अनेकदा जीवे मारण्याच्या धमक्या : बॉलीवूडचा सुपरस्टार अभिनेता सलमान खानच्या घराबाहेर अशा प्रकारे गोळीबार झाल्याची बातमी समोर येताच चाहत्यांमध्ये चिंतेचं वातावरण निर्माण झालंय. सलमानच्या सुरक्षेची सगळ्यांनाच चिंता आहे. कारण गेल्या अनेक वर्षांपासून सलमानला गोल्डी ब्रार आणि लॉरेन्स बिश्नोई या गुंडांकडून जीवे मारण्याच्या धमक्या येत आहेत. याआधीही सलमानवर हल्ला करण्याचा प्रयत्न झालाय. अशा परिस्थितीत अभिनेत्याच्या घराबाहेर झालेल्या गोळीबाराची बाब गंभीर मानली जाते.

धमकीनंतर वाढवली सुरक्षा : यापूर्वी महाराष्ट्र पोलीस कर्मचारी संरक्षणासाठी सलमानसोबत राहायचे. मात्र धमक्या आल्यानंतर त्याला Y+ श्रेणीची सुरक्षा देण्यात आली आहे. या सुरक्षा वर्तुळात 11 जवान नेहमीच सलमानसोबत राहतात. यात एक किंवा दोन कमांडो आणि 2 पीएसओ देखील असतात. सलमानच्या वाहनाच्या पुढे आणि मागे नेहमी दोन वाहनं असतात. यासोबतच सलमानची कारही पूर्णपणे बुलेटप्रूफ आहे.

हेही वाचा :

  1. स्टार स्टडेट ईद पार्टीमध्ये सलमान खानचा रुबाब, जल्लोष करणाऱ्या चाहत्यांना केलं अभिवादन - Salman Khan Eid
  2. "सारी दुनिया जला देंगे", म्हणत अनंत अंबानींच्या बर्थडे पार्टीत सलमान खान झाला सामील - Salman Khan Joins B Praak
Last Updated : Apr 14, 2024, 11:11 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details