नवी मुंबईSalman Khan Firing Case : बॉलिवूडचा भाईजान अभिनेता सलमान खानच्या (Salman Khan) घरावर झालेल्या गोळीबाराच्या घटनेमुळं मुंबईच नव्हे, तर संपूर्ण देश हादरला होता. दरम्यान पनवेलमध्ये अभिनेता सलमान खानच्या गाडीवर हल्ला करण्याचा कट रचल्याप्रकरणी नवी मुंबई पोलिसांनी लॉरेन्स बिश्नोईच्या टोळीतील चौघांना अटक केली. त्यासाठी पाकिस्तानमधून शस्त्रास्त्र पुरवणाऱ्या एका तस्कराकडून शस्त्रं मागवण्याचीही योजना आखण्यात आली होती.
प्रतिक्रिया देताना उपायुक्त विवेक पानसरे (ETV BHARAT Reporter) चारही आरोपी लॉरेन्स बिश्नोई टोळीचे: पोलिसांनी अटक केलेले चारही आरोपी लॉरेन्स बिश्नोई टोळीचे आहेत. त्यांनी सलमान खानचा पनवेल येथील फार्म हाऊस आणि अनेक शूटिंग साइट्सची रेकी केली होती. सलमान खानवर एके-47 आणि इतर अनेक शस्त्रांनी गोळीबार करण्याचे आदेश देण्यात आल्याचे आरोपींच्या मोबाईलमधून असे अनेक व्हिडिओ पोलिसांनी जप्त केले आहेत.
सलमानच्या घरावर गोळीबार :14 एप्रिल रोजी मुंबईतील वांद्रे भागातील गॅलेक्सी अपार्टमेंटमधील सलमानच्या घराबाहेर दुचाकीवरुन आलेल्या दोघांनी गोळीबार केला आणि तेथून पळ काढला. या हल्ल्याची जबाबदारी लॉरेन्स बिश्नोईनं घेतली होती. त्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करुन दोन्ही शूटर्सना अटक केली. चौकशीत दोघांनी लॉरेन्स टोळीकडूनच या कामासाठी सुपारी घेतल्याची कबुली दिली होती. सलमान खानच्या घराबाहेर गोळीबार करण्याचा कट ऑक्टोबर 2023 मध्ये रचण्यात आल्याची माहिती मुंबई गुन्हे शाखेला तपासादरम्यान मिळाली होती. याप्रकरणी मुंबई क्राईम ब्रँचनं बिश्नोई बंधूंना आरोपी बनवलं असून लॉरेन्स बिश्नोई सध्या गुजरातच्या साबरमती तुरुंगात आहे.
17 लोकांवर गुन्हा दाखल : धनंजय उर्फ अजय कश्यप, गौरव भाटिया उर्फ न्हवी, वास्पी खान उर्फ वसीम चिकना आणि रिजवान खान उर्फ जावेद खान अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावं आहेत. पोलिसांनी लॉरेन्स बिश्नोई, अनमोल बिश्नोई, संपत नेहरा, गोल्डी ब्रार यांच्यासह 17 हून अधिक लोकांविरुद्ध गुन्हा नोंदवला असून पुढील तपास सुरू आहे.
हेही वाचा