महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

सलमान खान स्टारर 'बीवी नंबर 1' पुन्हा होणार रुपेरी पडद्यावर प्रदर्शित, जाणून घ्या तारीख... - BIWI NO 1

सलमान खान आणि करिश्मा कपूर अभिनीत 'बीवी नंबर 1' हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर पुन्हा प्रदर्शित होत आहे.

salman khan
सलमान खान ('बीवी नं 1' री-रिलीज (Movie Poster))

By ETV Bharat Entertainment Team

Published : Nov 21, 2024, 4:02 PM IST

मुंबई : अलीकडेच शाहरुख खानचे अनेक जुने चित्रपट बॉक्स ऑफिसवर प्रदर्शित झाले होते. यात 'वीर जारा' आणि 'कल हो ना हो' यांचा समावेश आहे. यानंतर शाहरुख खान आणि सलमान खानचा ब्लॉकबस्टर चित्रपट 'करण-अर्जुन' पुन्हा रुपेरी पडद्यावर दाखल झाला. आता सलमान खान, सुष्मिता सेन आणि अनिल कपूर स्टारर फॅमिली ड्रामा आणि एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर चित्रपट 'बीवी नंबर 1' थिएटरमध्ये पुन्हा प्रदर्शित होत आहे. आता जुने आयकॉनिक चित्रपट पुन्हा प्रदर्शित करण्याचा ट्रेंड सुरू झाला आहे.

'बीवी नंबर 1' पुन्हा होईल रिलीज : 'बीवी नंबर 1'चा नवीन ट्रेलर आज सोशल मीडियावर रिलीज करण्यात आला आहे. चित्रपट निर्माता जॅकी भगनानीनं गुरुवारी त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर एक पोस्ट शेअर केली. यामध्ये 'बीवी नंबर 1' या चित्रपटाच्या पुन्हा रिलीजबद्दल माहिती देण्यात आली. या पोस्टमध्ये जॅकीनं लिहिलं, 'डेव्हिड धवनचा मनोरंजन करणारा चित्रपट 'बीवी नंबर 1' पुन्हा थिएटरमध्ये पाहण्यासाठी सज्ज व्हा, तो 29 नोव्हेंबर रोजी रिलीज होत आहे.' यानंतर या पोस्टवर अनेक यूजर्सनं आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. 'बीवी नंबर 1' हा चित्रपट अनेकांना पसंत पडला होता. या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली होती.

'बीवी नंबर 1' कहाणी:'बीवी नंबर 1' चित्रपटाचे दिग्दर्शन वरुण धवनचे वडील डेव्हिड धवन यांनी केलंय. या चित्रपटात करिश्मा कपूरनं सलमान खानच्या पत्नीची भूमिका साकारली होती. 'बीवी नंबर 1' चित्रपटात सलमान खानचे सुष्मिता सेनबरोबर एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर दाखविण्यात आले होते. याशिवाय चित्रपटात अनिल कपूर करिश्मा कपूरला मदत करतो. 1999 साली प्रदर्शित झालेला 'बीवी नंबर 1' हा चित्रपट सलमान खानच्या करिअरमधील विशेष चित्रपटापैकी एक आहे. 12 कोटींच्या बजेटमध्ये बनलेल्या 'बीवी नंबर 1' या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर अंदाजे 50 कोटींचा व्यवसाय केला होता. आता चित्रपटगृहांमध्ये 'बीवी नंबर 1' रिलीज झाल्यानंतर किती कमाई करेल, हे काही दिवसात समजेल.

हेही वाचा :

  1. सलीम खान, हेमा मालिनी, श्रद्धा कपूर, राकेश रोशनसह सेलेब्रिटींनी केलं मुंबईत मतदान
  2. 'बिग बॉस 18'मध्ये सलमान खानच्या क्लॉसनंतर अश्नीर ग्रोव्हरची प्रतिक्रिया, वाचा पोस्ट
  3. शाहरुख सलमान स्टारर 'करण अर्जुन'च्या ट्रेलरसाठी हृतिक रोशननं दिला आवाज, व्हिडिओ झाला व्हायरल

ABOUT THE AUTHOR

...view details