मुंबई - Anant Ambani's 29th birthday: हिंदी चित्रपटसृष्टीचा दबंग सलमान खान सोमवारी रात्री पुन्हा एकदा गुजरातच्या जामनगर विमानतळावर दिसला. सलमान खान 10 एप्रिल रोजी होणाऱ्या अनंत अंबानींच्या 29 व्या वाढदिवसाच्या पार्टीला पोहचला आहे. या पार्टीमध्ये इतरही सेलिब्रिटी देखील उपस्थित आहे. जामनगरला पोहोचलेल्या सेलिब्रिटींचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. एका व्हिडिओमध्ये सलमान खान जामनगरच्या विमानतळावर दिसत आहे. व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये त्यानं काळा टी-शर्ट आणि निळ्या रंगाची डेनिम जीन्स घातला आहे. याशिवाय सलमान हा फोनवर बोलताना व्हिडिओत दिसत आहे.
अनंत अंबानीचा वाढदिवस : व्हिडिओत नेहमीप्रमाणेच त्याचा अंगरक्षक शेराही त्याच्याबरोबर आहे. दरम्यान मिळालेल्या माहितीनुसार जान्हवी कपूर आणि तिचा कथित बॉयफ्रेंड शिखर पहाडिया देखील अनंतच्या ग्रँड बर्थडे पार्टीला जामनगरमध्ये पोहोचले आहेत. तसेच विमातळावर ओरहान अवत्रामानी उर्फ ओरी देखील स्पॉट झाला. ओरीनं यावेळी फोटोसाठी पापाराझींला पोझही दिली. रिलायन्सचे अध्यक्ष मुकेश अंबानी आणि त्यांची पत्नी नीता अंबानी 10 एप्रिल रोजी त्यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानीचा 29 वा वाढदिवस उत्साहात साजरा करणार आहेत. या वर्षाच्या सुरुवातीला, अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांनी जामनगरमध्ये त्यांचे तीन दिवसीय प्री-वेडिंग सेलिब्रेशन आयोजित केले होते.