मुंबई - Phantom Poster Used by Terrorists : जैश-ए-मोहम्मद (JeM) या दहशतवादी गटाने तयार केलेल्या प्रचाराच्या व्हिडिओबाबत जम्मू-काश्मीर पोलिसांनी चेतावणी जारी केली आहे. या व्हिडिओमध्ये सैफ अली खानच्या फँटम चित्रपटाच्या पोस्टरचा समावेश आहे.
पोलिसांच्या म्हणण्यानुसार, असा कंटेंट शेअर करणं किंवा फॉरवर्ड करणं बेकायदेशीर अॅक्टिव्हिटी (प्रतिबंध) कायदा (UAPA) च्या कलम 13 आणि 18 अंतर्गत बेकायदेशीर मानलं जातं. जम्मू-काश्मीर पोलिसांनी सोशल मीडिया पोस्टमध्ये म्हटलं आहे की, "जैशने अभिनेता सैफ अली खानच्या 'फँटम' चित्रपटाच्या पोस्टरसह 5 मिनिटे 55 सेकंदांचा व्हिडिओ नुकताच 22 जुलै 2024 रोजी दुपारी 2 च्या सुमारास शत्रूने प्रसिद्ध केला आहे."
त्यांनी लोकांना हा प्रचार व्हिडिओ प्रसारित करण्यापासून सावध केलं आणि त्यांना ते मिळाल्यास तपशील प्रदान देण्याचं आवाहन केलं. "सामान्य लोकांना सावध केलं जातं आहे की, त्यांनी पुढील गोष्टी कराव्यात : पहिली गोष्ट म्हणजे ते कोणत्याही प्रकारे, कोणालाही फॉरवर्ड करणार नाहीत. दुसरं म्हणजे, ते मेसेज देऊन कळवतील की त्यांना हा प्रचार व्हिडिओ कोणाकडून मिळाला आहे. दूरध्वनी क्रमांक आणि व्हिडिओ मिळाल्याची तारीख आणि वेळ पोलिस अधिकाऱ्यांनी त्यांच्या पर्यवेक्षी अधिकाऱ्याला कळवावी आणि नागरी अधिकाऱ्यांनी त्यांच्या पर्यवेक्षक अधिकाऱ्यांना मजकूर मेसेजच्या माध्यामातून कळवावा," असे जम्मू काश्मीर पोलिसांनी त्यांच्या सोशल मीडिया पोस्टमध्ये पुढं म्हटलं आहे.