महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

'रियल' आणि 'रील' जीवनातील माय व लेक आल्या 'मायलेक' साठी एकत्र! - Mylek star cast - MYLEK STAR CAST

Mylek star cast : मराठीचा छोटा आणि मोठा पडदा गाजवणारी अभिनेत्री सोनाली खरेचा नवा चित्रपट प्रदर्शित होतोय. याचं शीर्षक आहे 'मायलेक' आणि याचं वैशिष्ठ्य म्हणजे यात सोनालीचीच्या मुलीची भूमिका तिच्या लेकीनंच साकारली आहे.

Mylek star cast
उमेश कामतसह सोनाली आणि सनाया

By ETV Bharat Marathi Team

Published : Apr 6, 2024, 5:11 PM IST

मुंबई - Mylek star cast : मराठी चित्रपटविश्वात नवनवीन संकल्पना राबवल्या जाताना दिसतात. विषयातील चोखंदळपणा आणि संवेदनशील कथानकं ही मराठी सिनेमांची खासियत आहे. आता एक नवीन चित्रपट येऊ घातला आहे, ज्यात खऱ्या जीवनातील आई आणि मुलगी चंदेरी पडद्यावर माय लेकीच्या भूमिकेत एकत्र दिसणार आहेत. चित्रपटाचे नाव सुद्धा आहे 'मायलेक' आहे. हा चित्रपट एकल पालकत्वावर बेतलेला असून यातून आई -मुलीतील केमिस्ट्री उलगडताना दिसेल. 'मायलेक'मध्ये खऱ्या आयुष्यातील माय लेक, सोनाली खरे आणि सनाया आनंद, पडद्यावरदेखील आई मुलीच्या भूमिका साकारत आहेत.



नुकताच 'मायलेक' या चित्रपटाचा ट्रेलर अनावरण सोहळा पार पडला. या ट्रेलर लाँच सोहळ्याला चित्रपटाची संपूर्ण टीम आणि मराठी सिनेसृष्टीतील अमृता खानविलकर, हर्षदा खानविलकर, संजय जाधव आदी मान्यवर उपस्थित होते. चित्रपटात काम करणारे अभिनेता उमेश कामत, संजय मोने तसेच हिंदी चित्रपटसृष्टी गाजवलेला सोनालीचा नवरा बिजय आनंद देखील आवर्जून उपस्थित होते. हा एक अनवट कौटुंबिक चित्रपट असल्याचं ट्रेलर पाहून स्पष्ट जाणवतं. तसेच ट्रेलरमधून आईमुलीच्या बॉण्डिंग बरोबरच त्यांचा नात्यातील दुरावा आणि भावनिक तारांबळ दिसून येते. या चित्रापटाचे दिग्दर्शन प्रियांका तन्वर यांनी केले असून त्यांनी भावनिक नात्यांची गुंफण उत्तमपणे पेश केली आहे हे जाणवते.

सोनाली खरे, सनाया आनंदआणि अमृता खानविलकर



'मायलेक' या चित्रपटाची निर्मिती ब्लुमिंग लोटस प्रोडक्शन्स आणि प्रस्तुती आहे सोनाली सराओगीची. या चित्रपटाची सोनाली आनंद निर्माती असून कल्पिता खरे, बिजय आनंद यांनी सहनिर्मिती केली आहे. तसेच नितीन प्रकाश वैद्य या चित्रपटाचे असोसिएट प्रोड्यूसर आहेत. या चित्रपटात सोनाली खरे, सनाया आनंद, उमेश कामत, बिजय आनंद, शुभांगी लाटकर, संजय मोने यांच्या प्रमुख भूमिका आहेत. 'मायलेक' हा चित्रपट येत्या १९ एप्रिल रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

माललेक स्टार कास्ट

हेही वाचा -

  1. प्रेमिकांच्या चेहऱ्यासमोरील पुस्तकं हटली, चेहरे पाहून चुकले चाहत्यांचे सर्व अंदाज - PYAR KE DO NAAM MOVIE
  2. टायगर श्रॉफने उघडले सेलेब्रिटी फिटनेस सेंटर, एक्स दिशा पटानीनं लावली नव्या बॉयफ्रेंडबरोबर हजेरी - Tiger Shroff fitness center
  3. अजय देवगणनं 'मैदान'च्या रिलीजपूर्वी घेतला क्रिकेटचा आनंद , फोटो व्हायरल - maidaan Movie

ABOUT THE AUTHOR

...view details