मुंबई - Raveena Tandon and Rasha :अभिनेत्री रवीना टंडन गेल्या काही दिवसांपासून तिची मुलगी राशाबरोबर तीर्थयात्रा करत आहे. नुकतेच त्यांनी महाराष्ट्रातील भीमाशंकर मंदिरात दर्शन घेतलं. यापूर्वी मायलेकीच्या जोडीनं उज्जैनचे महाकाल, काशी विश्वनाथ (वाराणसी, उत्तर प्रदेश), बद्रीनाथ (उत्तराखंड), गुजरातचे सोमनाथ मंदिर अशा अनेक पवित्र स्थळांना भेटी दिल्या होत्या. आता सोशल मीडियावर त्याचे काही फोटो व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये दोघेही भक्तीमध्ये तल्लीन झाल्याचं दिसत आहे. दरम्यान 6 मे रोजी रवीना टंडननं तिच्या अधिकृत इंस्टाग्रामवर भीमाशंकर मंदिरातील काही सुंदर फोटो शेअर केले आहेत.
रवीना टंडननं मुलीबरोबर केली तीर्थयात्रा :महाराष्ट्रातील भीमाशंकर हे मंदिर 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे. या फोटोमध्ये तिच्याबरोबर तिची मुलगी राशा देखील दिसत आहे. दरम्यान, हे फोटो शेअर करताना रवीनानं कॅप्शनमध्ये लिहिलं की, "भोलो महादेव महाराज की जय, भीमाशंकर 12 ज्योतिर्लिंग दर्शन!" शेअर केलेल्या पहिल्या फोटोत रवीना आणि राशा पारंपारिक आणि साध्या लूकमध्ये दिसत आहेत. रवीनानं यावेळी लाल बॉर्डर असलेली क्रिम कलरची साडी नेसली होती, तर राखाडी-पांढऱ्या रंगाच्या फ्लोरल प्रिंटेड सूटमध्ये राशा सुंदर दिसत होती. फोटोत रवीना आणि राशाच्या कपाळावर चंदन दिसत आहे. हातात प्रसादाची टोपली घेऊन दोघीही कॅमेरासमोर फोटोसाठी पोझ देताना दिसत आहे.