महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

'रामायण'साठी रणबीर कपूरची नवीन हेअरकट, फोटो व्हायरल पहा - ranbir kapoor new haircut - RANBIR KAPOOR NEW HAIRCUT

Ranbir kapoor : रणबीर कपूरचा नवीन लूक हा सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या फोटोमध्ये त्याची हेअरस्टाइल खूप सुंदर दिसत आहे. त्याचा हा लूक रामायण या आगामी चित्रपटासाठी असल्याचं सांगण्यात येतंय.

Ranbir kapoor
रणबीर कपूर (रणबीर कपूर (aalimhakim- Instagram))

By ETV Bharat Marathi Team

Published : May 9, 2024, 3:06 PM IST

मुंबई - Ranbir kapoor : हिंदी चित्रपटसृष्टीचा सुंदर अभिनेता रणबीर कपूर, मागील मेगा ब्लॉकबस्टर चित्रपट 'ॲनिमल'च्या यशानंतर तो नितेश तिवारीच्या 'रामायण' चित्रपटामध्ये दिसणार आहे. या चित्रपटाची बऱ्यांच दिवसांपासून चर्चेत आहेत. 'रामायण' चित्रपटाचे शूटिंग दिवसापूर्वी सुरू झाले असून रणबीर कपूर या चित्रपटामध्ये श्रीरामच्या भूमिकेत दिसणार आहे. याशिवाय या चित्रपटामध्ये साऊथ अभिनेत्री साई पल्लवी ही सीतेच्या भूमिकेत झळकणार आहे. दरम्यान सोशल मीडियावर रणबीर कपूरचा नवा हेअरकट लूकही इंटरनेटवर धुमाकूळ घालत आहे. 'रामायण' चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान रणबीरनं नवीन हेअरकट केली आहे.

रणबीर कपूरची हेअरस्टाइल : त्याची हेअरकट अनेकांना आवडत आहे. रणबीरचे नवीन हेअरकट पाहिल्यानंतर, युजर्सला 'ॲनिमल' चित्रपटातील खलनायक अबरार हक (बॉबी देओल) च्या शेवटच्या सीनमध्ये दिसणारा लहान भावाचा (रणबीर) लूक आठवला आहे. रणबीर कपूरला नवीन हेअर कट हेअरस्टाइलिस्ट आलिम हकीम यांनी दिला आहे. या हेअरस्टाइलिस्टनं महेश बाबू, राम चरण, एमएस धोनी आणि विराट कोहली यांच्यासह अनेक सेलिब्रिटींना नवा लूक दिला आहे. आलिमनं त्याच्या इंस्टाग्रामवर रणबीर कपूरच्या नवीन हेअरकटचे फोटो शेअर केले आहेत. हे फोटो आलिमनं क्लिक केले आहेत. आता या पोस्टवर अनेकजण कमेंट्स करून रणबीरचं कौतुक करत आहेत.

'रामायण' चित्रपटाबद्दल : 'रामायण' चित्रपटामध्ये रणबीर कपूर, साई पल्लवी व्यतिरिक्त अरुण गोविल आणि लारा दत्ता, हृतिक रोशन, दीपिका पदुकोण आणि इतर कलाकार असणार आहेत. या चित्रपटाचे निर्माते मधु मंतेना, अल्लू अरविंद आहेत. दरम्यान रणबीर कपूरच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर तो या पुढं 'लव्ह अ‍ॅन्ड वॉर' या चित्रपटामध्ये आलिया भट्ट आणि विकी कौशलबरोबर दिसणार आहे. सध्या या चित्रपटाबद्दल खूप चर्चा सुरू आहेत याशिवाय तो 'ब्रह्मास्त्र पार्ट 2' आणि ' ब्रह्मास्त्र पार्ट 3'मध्ये दिसणार आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन अयान मुखर्जी करत आहे.

हेही वाचा :

  1. विजय देवराकोंडाच्या वाढदिवसानिमित्त 'राउडी जनार्दन'ची घोषणा, पोस्टर रिलीज - Vijay Deverakonda Birthday
  2. सलमानच्या घराबाहेर गोळीबार प्रकरणी आरोपी रफिक चौधरीने आणखी दोन स्टारच्या घरांची केली होती पाहणी - Salman Khan house firing case
  3. सलमान खानच्या 'सिकंदर' शूटिंग सेटवरील व्हायरल फोटोमुळे चाहते संभ्रमात - Salman Khan

ABOUT THE AUTHOR

...view details