महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

जिममध्ये कठोर मेहनत करताना नव्या व्हिडिओमध्ये दिसला रणबीर कपूर - Ranbir Kapoor - RANBIR KAPOOR

रणबीर कपूर स्वतःला फिट ठेवण्यासाठी नियमितपणे व्यायाम करत असतो. त्याच्या फिटनेसचा प्रत्यय अलीकडे गाजलेल्या 'अ‍ॅनिमल' चित्रपटात जाणवला होता. सध्या तो जिममध्ये कठोर मेहनत करत असतानाचा एक व्हिडिओ चर्चेत आहे.

Ranbir Kapoor
रणबीर कपूर (ANI / Instagram)

By ETV Bharat Marathi Team

Published : Jun 7, 2024, 1:52 PM IST

मुंबई - स्वतःच्या फिटनेसचं महत्त्व ओळखून त्यासाठी काटेकोरपणा जपणारा अभिनेता म्हणून रणबीर कपूरला ओळखलं जातं. एका नवीन व्हिडिओमध्ये तो कठोर वर्कआउट करताना दिसत आहे. रणबीरच्या ट्रेनरनं गुरुवारी त्याच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर 'अ‍ॅनिमल' स्टार 'हेवी वर्कआउट' करत असलेला व्हिडिओ शेअर केला आहे.

रणबीरचं फिटनेससाठीची असलेली कमिटमेंट नेहमीच चाहत्यांच्या कौतुकाचा विषय ठरली आहे. त्याचा असा व्हिडिओ जेव्हा येतो तेव्हा त्यांच्या कमेंट सेक्शनमध्ये प्रतिक्रियांचा पाऊस पडल्याचं दिसतं. याहीवेळी त्याचीच पुनरावृत्ती झाल्याचं दिसलं. एका युजरनं लिहिलं की, रणबीर कपूर हा खऱ्या अर्थानं फिटनेस फ्रीक आहे. एकानं तर त्याला "तू पृथ्वीवरील सर्वात हॉट माणूस आहेस," असंही म्हटलंय. त्याच्याकडं असलेल्या एनर्जीचं काहींनी कौतुक केलंय.

दरम्यान, रणबीरच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं तर, तो 'अ‍ॅनिमल'च्या सिक्वेलमध्ये दिसणार आहे. या चित्रपटाचं शीर्षक 'अ‍ॅनिमल पार्क' असणार आहे. याबरोबरच तो नितेश तिवारीच्या बहुप्रतिक्षित 'रामायण' चित्रपटाची तयारी करत आहे. 'रामायण'मध्ये साई पल्लवी आणि लारा दत्ता यांच्याही भूमिका आहेत. मात्र, या चित्रपटाबाबत अधिकृत घोषणा होणं बाकी आहे. या चित्रपटात रणबीर भगवान रामाची भूमिका साकारताना दिसणार आहे.

अलीकडेच रणबीरनं त्याच्या तिरंदाजी प्रशिक्षकाबरोबरचे काही फोटो सोशल मीडियावर चाहत्यांसाठी शेअर केले आहेत. या फोटोतही तो नेमबाजीसाठी आत्मविश्वासानं कठोर मेहनत करत असल्याचं दिसलं होतं. या फोटोतून त्यानं 'रामायण' चित्रपटासाठी तिरंदाजीचे धडे घेत असल्याचे संकेत दिले होते.

येत्या काही महिन्यांत रणबीर कपूर आगामी 'लव्ह अँड वॉर' या संजय लीला भन्साळींच्या चित्रपटामध्येही दिसणार आहे. या चित्रपटात त्याची पत्नी आलिया भट्ट आणि अभिनेता विकी कौशल यांच्याही प्रमुख भूमिका आहेत.

हेही वाचा -

  1. नितीश कुमार, चंद्राबाबू नायडू आज तुमचे उद्या आमचे; संजय राऊतांचा मोठा दावा, 'कंगनाला मारणं चुकीचं' - Sanjay Raut On Kangana Beaten Case
  2. जातीय तणाव टाळण्यासाठी कर्नाटकात 'हमारे बारह' चित्रपटाच्या प्रदर्शनावर बंदी - Hamare Barah
  3. निवडणूक जिंकल्यानंतर पवन कल्याणचं कुटुंबीयांकडून जंगी स्वागत, चिरंजीवीच्या पायावर झाला नतमस्तक - Pawan Kalyan

ABOUT THE AUTHOR

...view details