मुंबई - Rakul Preet Singh Pehli Rasoi: अभिनेत्री रकुल प्रीत सिंग आणि जॅकी भगनानी 21 फेब्रुवारी रोजी गोव्यात लग्नबंधनात अडकले आहेत. या दोघांच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. त्यांचं शाही लग्न सध्या चर्चेत आहे. नवविवाहित वधू रकुलनं तिच्या सासरच्या घरातील पहिल्या स्वयंपाकघरात काय तयार केले याची झलक चाहत्यांबरोबर शेअर केली आहे. रकुल प्रीत सिंगनं पहिल्या रसोईसाठी हलवा बनवला आहे. दरम्यान रकुल आणि जॅकीच्या लग्नाबद्दल बोलायचं झालं तर या समारंभात अनेक सेलिब्रिटींनील हजेरी लावली होती. याशिवाय शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रानं संगीतच्या दिवशी जबरदस्त परफॉर्मेंस दिला होता.
रकुल प्रीत आणि जॅकीचा आऊटफिट : रकुल प्रीतनं तिच्या लग्नात पेस्टल रंगाचा लेहेंगा परिधान केला होता. तिनं फुल स्लीव्ह ब्लाउज आणि सुंदर नेकलेससह तिचा लूक पूर्ण केला होता. जॅकीही कलर कॉर्डिनेटेड आउटफिटमध्ये होता. या जोडप्यानं कौटुंबिक रीतीरिवाजांनुसार आनंद कारज आणि सिंधी पद्धतीनं विवाह केला आहे. हे दोघेही मुंबईला परत येत असताना रकुलनं पिवळ्या रंगाचा अनाकरली ड्रेस परिधान केला होता. याशिवाय तिच्या केसात सिंदूर आणि गळ्यात मंगळसूत्र होत. या लूकमध्ये ती खूप सुंदर दिसत होती. यावेळी जॅकीनं क्रीम कलरच्या कुर्ता परिधान केला होता. यामध्ये तो खूप देखणा दिसत होता.