मुंबई - Rakul Preet Singh Wedding Invitation viral: हिंदी चित्रपटसृष्टीतील अभिनेत्री रकुल प्रीत सिंग आणि अभिनेता-निर्माता जॅकी भगनानी यांच्या लग्नामुळे सध्या चर्चेत आहे. या जोडप्याच्या लग्नाचा दिवस जवळ येत आहे. दरम्यान जोडप्यानं त्यांच्या मित्रांबरोबर बॅचलर पार्टी आयोजित केली आहे. आता अनेकजण या जोडप्याला सोशल मीडियावर लग्नासाठी शुभेच्छा देताना दिसत आहेत. दरम्यान रकुल आणि जॅकीच्या लग्नाची पत्रिका सोशल मीडियावर व्हायरल झालीय. यासोबतच या जोडप्याचं लग्न कधी आणि कुठे पार पाडणार हे आता चाहत्यांना ठाऊक झालंय. रकुल प्रीत सिंग आणि जॅकी भगनानी यांच्या लग्नाचं कार्ड खूप रॉयल आहे.
रकुल आणि जॅकीच्या लग्नाची आमंत्रण पत्रिका व्हायरल : पांढऱ्या आणि निळ्या थीममध्ये असलेली रकुल आणि जॅकीच्या लग्नाची आमंत्रण पत्रिका खूप आकर्षक आहे. या कार्डमध्ये गोव्यामधील समुद्रकिनाऱ्याची थीम वापरण्यात आलीय. याशिवाय दुसऱ्या कार्डवर जोडप्याच्या लग्नाची तारीख 21 फेब्रुवारी अशी लिहिली आहे. या दिवशी जोडपे 'सप्तपदी' करतील. सध्या कार्डमध्ये लग्नाच्या रिसेप्शनची कोणतीही माहिती समोर आलेली नाही. गेल्या अनेक महिन्यांपासून हे जोडपं लग्नाची तयारी करत होतं. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जेव्हा लक्षद्वीप पर्यटनासाठी योग्य असल्याचं सांगितलं, तेव्हा या जोडप्यानं देशातच लग्न करण्याचा निर्णय घेतला. रकुल आणि जॅकीचं लग्न खूप भव्य असणार आहे. या लग्नात काही सेलिब्रिटी उपस्थित राहण्याची शक्यता वर्तवली जात आहे.