मुंबई- 'प्यार का पंचनामा 2' या गाजलेल्या आणि तरुणाईमध्ये अजूनही लोकप्रिय असलेल्या कलाकारांपैकी सनी सिंगच्या बहिणीच्या लग्नाच्या रिसेप्शनमध्ये चित्रपटाची स्टार कास्ट पुन्हा एकत्र आली. कार्तिक आर्यन, नुश्रत भरुच्चा, इशिता राजतो आणि दिग्दर्शक लव रंजन या सर्वांनी कार्यक्रमाला उपस्थिती लावली होती.
इंस्टाग्राम स्टोरीजवर सनी सिंगने स्वतःचा आणि कार्तिकचा एक फोटो शेअर केला आहे. ब्लेझर सेट लूकमध्ये कार्तिक आणि सनी खूपच दमदार दिसत आहेत. नुसरत लाल साडीत अतिशय सुंदर दिसत होती तर इशिता आणि सोनालीनेही साडी नेसणे पसंत केले होते.
'प्यार का पंचनामा 2' स्टार कास्ट लव रंजन दिग्दर्शित, 'प्यार का पंचनामा 2' हे आधुनिक काळातील नातेसंबंधांचे कॉमिक चित्रण आहे. तीन मित्रांची ही गोष्ट खळबळजनक, रोमँटिक नातेसंबंधांची गुंतागुंतीची कथा आहे. ते आपलं प्रेम प्रकरण टिकवण्यासाठी, दिलेली प्रमिसेस पूर्ण करण्यासाठी अनेक अडचणींमधून मार्ग काढत असताना, त्यांना अनेक अडथळे आणि गैरसमजांना सामोरे जावे लागते आणि त्यांच्या मैत्री आणि नातेसंबंधांना सतत नव्या परीक्षेला सामोरं जावं लागतं. हा कॉमेडी ड्रामा चित्रपट आधुनिक समाजातील रोमँटिक नातेसंबंधांच्या चढ-उतारांवर एक नवा दृष्टीकोन देतो. त्यांची भाषा, प्रासंगिक विनोद, चतुराई यामुळे प्रेक्षकांचं भरपूर मनोरंजन करण्यात 'प्यार का पंचनामा' चित्रपटाचे दोन्ही भाग कोणतीही कसर सोडत नाहीत.
दरम्यान, वर्क फ्रंटवर, सनी सिंगने नुकतेच कोलकाता येथे त्याच्या 'रिस्की रोमियो' चित्रपटाचे शूटिंग अलिकडेच पूर्ण केले आहे. या चित्रपटाबद्दल उत्साहित असलेल्या सनीने एका निवेदनात म्हटले आहे की, "मला सहसा अशा प्रकारच्या व्यक्तीरेखा ऑफर केल्या जात नाहीत आणि जेव्हा मी शूटिंग सुरू केले तेव्हाच मला समजले की अबीरने माझ्यामध्ये काय पाहिले आणि मला अशी वेगळी भूमिका का ऑफर केली. या चित्रपटाचा प्रकार पूर्णपणे अनोखा आहे. आमच्या इंडस्ट्रीमध्ये अनपेक्षित आणि अतिशय वेगळ्या पद्धतीने भावनांचे प्रदर्शन करण्याच्या दिशेने त्यानं टाकलेलं हे एक धाडसी पाऊल आहे. अबीरने 'रिस्की रोमियो' चित्रपटासाठी निवडलेले शहर कथेची जादू वाढवत आहे. आम्ही जे अनुभवले त्याचा प्रेक्षकांना अनुभव देण्यासाठी मी अधिक काळ वाट पाहू शकत नाही. सध्या या चित्रपटाचे शूटिंग करत आहे."
'रिस्की रोमियो'चे लेखन आणि दिग्दर्शन अबीर सेनगुप्ता यांनी केले आहे. याची निर्मिती अनुश्री मेहता (जादुगर फिल्म्स), प्रियांका मेहरोत्रा आणि रमेशचद्र यादव (पीआर मोशन पिक्चर्स) यांनी केली आहे. चित्रपटाबद्दलचा अधिक तपशील अद्यापही गुलदस्त्यात ठेवण्यात आलाय.
दुसरीकडे कार्तिक आर्यनने त्याच्या आगामी हॉरर कॉमेडी चित्रपट 'भूल भुलैया 3' च्या शूटिंगला सुरुवात केली आहे. याशिवाय कार्तिकने नुकतेच त्याच्या आगामी 'चंदू चॅम्पियन' या चित्रपटाचे शूटिंग पूर्ण केले आहे. हा एक स्पोर्ट्स ड्रामा चित्रपट असून याचं दिग्दर्शन कबीर खानने केलं आहे. यामध्ये कार्तिक चंदू ही व्यक्तीरेखा साकारत आहे. 'चंदू चॅम्पियन' हा कार्तिकचा दिग्दर्शक कबीर खान बरोबरचा पहिलाच चित्रपट आहे. तो दिग्दर्शक अनुराग बसूच्या आगामी 'आशिकी 3' मध्येही दिसणार आहे.
हेही वाचा -
- "ते माझ्या हृदयाच्या जवळचे लोकेशन होते": 'मडगाव एक्स्प्रेस' गोव्यातच का शूट केले याचा कुणाल खेमूने केला खुलासा
- Pulkit Kriti Wedding Details: पुलकित सम्राट आणि क्रिती खरबंदा अडकणार लग्नबेडीत; पाहा लग्नामधील विधीचा तपशील
- झी सिने अवॉर्ड्समध्ये किंग खानची धुम; 'जवान'नं मारली बाजी