मुंबई - Song Sooseki Pushpa 2 : अभिनेता अल्लू अर्जुन स्टारर मोस्ट अवेटेड चित्रपट 'पुष्पा 2 द रुल' मधील दुसरे गाणं 'सुसेकी'ची झलक आज 23 मे रोजी शेअर करण्यात आली आहे. अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदान्ना ही सुपरहिट जोडी 'सुसेकी' या गाण्यानं पुन्हा एकदा धमाल करण्यासाठी सज्ज झाली आहे. 'पुष्पा 2 द रुल'च्या निर्मात्यांनी 'सुसेकी' गाण्याचा प्रोमो रिलीज करून चाहत्यांना एक भेट दिली आहे. या प्रोमोमध्ये रश्मिका दिसत असून मेकअप आर्टिस्ट तिचे टचअप करून देताना दिसत आहे. यानंतर ती पुष्पा राजची स्टाईल करते. 'सुसेकी' कधी रिलीज होईल, याबद्दल प्रोमोत सांगितलं गेलं आहे.
'पुष्पा 2 द रुल'मधील 'सुसेकी' गाण्याची झलक :याआधी 22 मे रोजी निर्मात्यांनी 'पुष्पा 2 द रुल'च्या 'सुसेकी' गाण्याबद्दल माहिती दिली होती. आता हे गाणं 29 मे रोजी सकाळी 11.07 वाजता रिलीज होणार आहे. 'सुसेकी' या गाण्याला संगीत देवी श्री प्रसाद यांनी दिलं आहे. 'पुष्पा'च्या पहिल्या पार्टमधील गाण्यानं याआधी जगभर धमाका केला होता. यामध्ये 'ओम अंतवा', 'सामी-सामी' आणि 'श्रीवल्ली' ही गाणी खूप गाजली होती. आता 'पुष्पा 2 द रुल' या चित्रपटातील गाण्यांना किती पसंती मिळते, हे काही दिवसात कळेल. 'पुष्पा 2 द रुल' चित्रपटामधील 'पुष्पा पुष्पा' या गाण्याला खूप पसंती मिळाली आहे. या गाण्यानं विक्रम रचला असून आता दुसरे गाणं किती कमाल करेल हे पाहावं लागेल.