महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

पॉप क्विन रेहाना झाली 'सैराट', जान्हवी कपूरसह केला 'झिंगाट'वर डान्स - जानव्ही कपूर

अनंत अंबानी आणि राधिका मर्चंटच्या प्री वेडिंग सोहळ्यातील रिहानाच्या परफॉर्मन्सचे अनेक व्हिडिओ व्हायरल झालेत. यामध्ये ती मराठीतील 'सैराट' चित्रपटाचा हिंदी रिमेक असलेल्या 'धडक' चित्रपटातील 'झिंगाट' गाण्यावर जान्हवी कपूरसह डान्स करत असतानाचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

Pop queen Rehana went Sairat
पॉप क्विन रेहाना झाली 'सैराट'

By ETV Bharat Marathi Team

Published : Mar 2, 2024, 4:20 PM IST

जामनगर ( गुजरात ) - मुकेश अंबानींचा धाकटा मुलगा अनंत अंबानी आणि उद्योगपती वीरेन मर्चंट यांची मुलगी राधिका मर्चंट यांचा विवाहपूर्व सोहळा गुजरातेत जामनगरमध्ये सुरू आहे. 1 मार्च ते 3 मार्चपर्यंत चालणाऱ्या या कार्यक्रमाला जगभरातून पाहुणे आले आहेत. 1 जानेवारीची सध्याकाळ खूप खास होती. आंतराष्ट्रीय पॉप संगिताची राणी रिहानाचा खास कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यामध्ये रिहानाने तिच्या धमाकेदार पऱफॉर्मन्सने प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले. रिहाना पहिल्यांदाच भारतात परफॉर्मन्स करत असल्यामुळे ती आणि तिचे सहकलाकारच खूप उत्साहात होते. उपस्थित प्रेक्षकांनीही या भव्य सोहळ्याचा मनमुराद आनंद घेतला. याचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर झाले असतानाच अभिनेत्री जान्हवी कपूरने एक रिहानासह डान्स करतानाचा एक व्हिडिओ शेअर करुन धमाल उडवून दिली आहे.

जान्हवीने शेअर केलेल्या व्हिडिओत 'सैराट' चित्रपटाचा हिंदी रिमेक असलेल्या जान्हवीच्या पदार्पणाच्या 'धडक' चित्रपटातील गाणे वाजताना दिसते. अजय आणि अतुल यांनी संगितबद्ध केलेल्या आणि गायलेल्या या गाण्याच्या तालावर रिहाना आणि जान्हवी थिरकताना दिसत आहे. या डान्सच्यावेळी दोघींच्याही चेहऱ्यावर आनंद दिसत असून रिहानासह केलेला हा डान्स जान्हवीसाठी संस्मरणीय आठवण असेल.

जान्हवीने हा व्हिडिओ शेअर केल्यानंतर तिच्यावर लाईक्ससह कमेंट सेक्शनमध्ये प्रतिक्रियांचा पाऊस पडला आहे. दोघींचा हा परफॉर्मन्स आवडल्याचे प्रेक्षक प्रतिक्रियातून कळवत आहेत. पॉप क्विन रिहानाने तिच्या 'वर्क' या लोकप्रिय ट्रॅकवरही परफॉर्मन्स सादर केला. तिने 'रुड बॉय', 'पॉर इट अप', 'डायमंड्स' आणि 'वाइल्ड थिंग्ज' यासह तिच्या स्रव हिट गाण्यांवर प्रेक्षकांना अक्षरशः मंत्रमुग्ध केलं. तिनं या सोहळ्यासाठी आंत्रीत केल्याबद्दल अंबानी कुटुंबाचे आभार मानले आणि अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट या जोडप्याला मनापासून शुभेच्छा दिल्या.

अनंत अंबानी आणि राधिका मर्चंटच्या प्री वेडिंग सोहळ्यासाठी शाहरुख खान, सलमान खान, रणबीर कपूर यांसारख्या बॉलिवूड सेलिब्रिटींपासून ते एमएस धोनी, रोहित शर्मा, सचिन तेंडुलकर यांसारख्या प्रसिद्ध क्रीडा व्यक्तिमत्त्वांपर्यंत विविध क्षेत्रातील अनेक दिग्गज सेलेब्रिटी या तीन दिवसांच्या भव्य सोहळ्यासाठी उपस्थित राहिले आहेत.

हेही वाचा -

  1. 'आभाळमाया'तले सुधा आणि शरद जोशी पुन्हा एकत्र! सुकन्या मोने आणि मनोज जोशी झळकणार कांचन अधिकारींच्या नव्या चित्रपटात
  2. शाहरुख आणि रणवीरची अनंत-राधिकांच्या प्री-वेडिंग पार्टीत ड्वेन ब्राव्होसह पोज
  3. अनंत-राधिकाच्या प्री-वेडिंग सोहळ्यात पॉप क्वीन रिहानाचा नेत्रदीपक परफॉर्मन्स

ABOUT THE AUTHOR

...view details