मुंबई Tamanna bhatia : बॉलीवूड अभिनेत्री तमन्ना भाटिया कायद्याच्या कचाट्यात अडकली असल्याचं दिसत आहे. महाराष्ट्र सायबर सेलकडून तमन्ना भाटियाला समन्स पाठवण्यात आलं असून मंगळवारी चौकशीला हजर राहण्यास सांगितलं आहे. गेल्या वर्षीच्या आयपीएल स्पर्धा एका ॲपवर अवैधरित्या प्रसारित केल्याप्रकरणी हे समन्स बजवण्यात आलंय. आता तमन्नाच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.
अॅपवर आयपीएल 2023चं बेकायदेशीर प्रसारण : इंडियन प्रीमियर लीग प्रसारणाचे हक्क पूर्णपणे वायकॉम 18 यांच्याकडे आहेत. मात्र बेकायदेशीरपणे एका अॅपवर आयपीएल 2023च्या सामन्यांचे प्रसारण करण्यात आले होते. यामुळे वायकॉम 18 समूहाला 100 कोटी रुपयांचं नुकसान झाल्याचा दावा केला गेला होता. वायकॉम 18कडून याबाबत तक्रार देण्यात आली होती. त्यानंतर महाराष्ट्र सायबर सेलकडून तमन्नाला 29 एप्रिल रोजी चौकशीसाठी हजर राहण्याचं समन्स बजवण्यात आलं आहे. याच प्रकरणी अभिनेता संजय दत्तला देखील 23 एप्रिलला समन्स बजवण्यात आलं होतं, मात्र तो भारतात नसल्यानं चौकशीसाठी वेळ मागितल्याची माहिती समोर येत आहे.
तमन्ना भाटिया केलीय ॲपसाठी जाहिरात :मिळालेल्या माहितीनुसार तमन्ना भाटियानं संबंधित ॲपसाठी जाहिरात केली होती. याविषयी पोलिसांना साक्षीदार म्हणून तमन्नाकडून काही माहिती घ्यायची आहे की, तिला हा प्रोजेक्ट कसा मिळाला. या जाहिरातसाठी कोणी संपर्क केला आणि तिला किती पैसा मिळाले. आता याबद्दल तिला विचारण्यात येणार असल्याचं समजत आहे.
'हे' ॲप नेमकं काय आहे :संबंधित ॲपकडे बेटिंग एक्सचेंज प्लॅटफॉर्म म्हणून बघितलं जातं. यावरून खेळ आणि मनोरंजन संबंधित जुगार खेळला जातो. ॲपनं दिलेल्या माहितीनुसार क्रिकेट हा सर्वात जास्त खेळला जाणारा खेळ आहे. क्रिकेट फुटबॉल, टेनिस बॉल सामने एकाच वेळी लाईव्ह बघता येतात आणि पैसे कमावता येत असल्याचा दावा ॲपकडून करण्यात आला आहे. हे ॲप महादेव ऑनलाइन गेमिंग ॲपची उपशाखा असल्याचं समोर येत आहे.
स्टार्सला वेगवेगळ्या कंपनीच्या माध्यामातून दिले गेले पैसे : सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार तपासात वेगवेगळ्या बँक खात्याच्या माध्यमातून कलाकारांना पैसे दिल्याचं उघड झालं आहे. संजय दत्तला प्ले वेंचर कंपनीच्या खात्यातून पैसे दिले गेले. ही कंपनी कुराकओ येथील असल्याचं समोर आलं आहे. गायक बादशाह याला लायकोस ग्रुप कंपनीच्या खात्यातून पैसे देण्यात आले, ही कंपनी दुबईमधील आहे. तर जॅकलीन फर्नांडिसला ड्रीम जनरल ट्रेडिंग एल एल सी कंपनीच्या माध्यमातून पैसे मिळाले ही कंपनी देखील दुबईत आहे. पोलिसांना तपासात या ॲपशिवाय इतरही ॲपच्या माध्यमातून पाकिस्तानला देखील पैसे जात असल्याचं समोर आलं आहे.
हेही वाचा :
- 'हीरामंडी' प्रीमियरमध्ये अदिती राव हैदरी आणि सिद्धार्थ दिसले एकत्र, व्हिडिओ व्हायरल - ADITI RAO HYDARI AND SIDDHARTH
- महानायक अमिताभ बच्चन लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कारानं सन्मानित, पुरस्कार मिळताच म्हणाले... - Lata Mangeshkar Award
- 'नाच गं घुमा' सिनेमातील स्त्री प्रत्येक घरातील स्त्रीचं प्रतिनिधित्व करते, मुक्ता बर्वेची प्रतिक्रिया - Mukta Barve