मुंबई -Aishwarya Rai Paris Fashion Week:'क्वीन ऑफ द रॅम्प' अशी ओळख असलेली हिंदी सिनेसृष्टीतील देखणी अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन हिने 23 सप्टेंबर रोजी पॅरिस फॅशन वीकमध्ये तिच्या गॉर्जियस लूकने शोमध्ये उपस्थितांची मनं जिंकली. बलून-हेम रेड ड्रेसमध्ये ऐश्वर्या खूपच सुंदर दिसत होती. मिस वर्ल्ड 1994 ची विजेती असलेल्या या सौंदर्यवतीच्या प्रत्येक हालचाली लोकांना आवडत असतानाच ऐश्वर्याच्या लग्नाच्या खासगी गोष्टींनी पुन्हा एकदा लोकांचे लक्ष वेधून घेतले. यावेळी तिनं आपल्या बोटात घातलेल्या अंगठीमुळे ऐश्वर्या आणि अभिषेक यांच्या घटस्फोटाच्या अफवांना पुन्हा एकदा ब्रेक लागला आहे.
पॅरिस फॅशन वीकमध्ये ऐश्वर्याच्या अंगठीनं वेधलं सर्वाचं लक्ष : पॅरिस फॅशन वीकमध्ये ऐश्वर्याच्या लग्नामधील अंगठीनं सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. यावेळी ऐश आपली अंगठी फ्लाँट करताना आणि प्रेक्षकांना फ्लाइंग किस देताना दिसली. ऐश्वर्या अनेक प्रसंगी ही अंगठी कॅरी करताना दिसली आहे. रिपोर्ट्सनुसार, सायमा 2024 पूर्वी तिच्या हातात अंगठी नव्हती. त्यामुळे घटस्फोटाच्या अफवा पसरल्या होत्या.काही दिवसांपूर्वी, पॅरिस फॅशन वीक सुरू होण्यापूर्वी, ऐश्वर्याचा एक व्हिडिओ समोर आला होता, यामध्ये ती पुन्हा लग्नाची अंगठी परिधान केलेली दिसली होती. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये ती तिच्या मुलीबरोबर होती. यादरम्यान देखील ती लग्नाची अंगठी फ्लाँट करताना दिसली.