मुंबई - ग्लोबल स्टार एड शीरन सध्या सहा शहरांच्या भारतीय संगीत दौऱ्यावर आहे, यामध्ये हैदराबाद, चेन्नई, बेंगळुरू, शिलाँग आणि दिल्ली यांचा समावेश आहे. सध्या एड शीरन हा भारतामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन तेथील पदार्थांचा आस्वाद घेत आहे. याशिवाय तो शहरांमध्ये फिरताना देखील दिसत आहे. मात्र आता एड हा चैन्नई येथे आहे. आज 5 फेब्रुवारी रोजी तो चेन्नईमध्ये शो करणार आहे. दरम्यान चेन्नईमध्ये सादरीकरणापूर्वी पॉप स्टार एड शीरन ऑस्कर विजेता संगीतकार एआर रहमान आणि त्यांचा मुलगा एआर अमीन यांना भेटला. आता त्याचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
एआर रहमान आणि एड शीरनचे फोटो व्हायरल : दरम्यान एआर रहमाननं त्यांच्या इंस्टाग्राम हँडलवर काही फोटो शेअर केले आहेत, यात ते ' गायक एड शीरन आणि मुलगा एआर अमीनबरोबर सोफ्यावर बसल्याचे दिसत आहे. तसेच दुसऱ्या एका फोटोमध्ये एआर रहमान हे खुर्चीवर बसलेले असून एड हा फोटो क्लिक करताना दिसत आहे. आता रहमान यांनी शेअर केलेल्या फोटोवर अनेकजण आपल्या प्रतिक्रिया देत आहेत. यापूर्वी ब्रिटिश संगीतकार एड शीरननं 30 जानेवारी रोजी पुण्यात कॉन्सर्ट केला होता. या कॉन्सर्टमध्ये त्यानं 'पुणे' असं नाव लिहिलेली टी- शर्ट घातली होती. यानंतर त्यानं 2 फेब्रुवारी रोजी हैदराबादमध्ये रामोजी फिल्म सिटीमध्ये शो केला होता. या शोमध्ये अरमान मलिकनं देखील त्याला साथ दिली होती. भारतीय दौऱ्याची निर्मिती आणि प्रमोशन एईजी प्रेझेंट्स एशिया, बुकमायशो लाईव्ह यांनी केली आहे.
एड शीरननं घेतला मालिशचा आनंद : आता पुढं एड शीरन चेन्नई, बेंगळुरू, शिलाँग आणि दिल्ली-एनसीआरमध्ये कॉन्सर्ट करणार आहे. दरम्यान या ब्रिटिश सिंगरचा आणखी एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यामध्ये एडच्या डोक्याची मालिश करत करताना एक व्यक्ती दिसत आहे. चेन्नईमध्ये एड सध्या देशी पाहुणचाराचा आनंद घेत आहे. तो अनेक देसी पदार्थ देखील खात आहे. दरम्यान शीरननं शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये तो हेड मसाज खूप एंजॉय करत आहे. या व्हिडिओच्या पोस्टमध्ये त्यानं लिहिलं 'चेन्नईमध्ये एड डोक्याची मालिश करत आहे.' आता एडच्या या पोस्टवर अनेकजण मजेशीर प्रतिक्रिया देत आहेत. या व्हिडिओच्या पोस्टमध्ये एका व्यक्तीनं लिहिलं, 'आता जर तुम्ही गाण्याचे बोल विसरलात तर आम्हाला कारण कळेल.' आणखी एकानं लिहिलं, 'कधीही वाटलं नव्हतं, की मला हा दिवस दिसेल. 'आणखी एकानं लिहिलं, 'या मसाजनंतर, एड शीरन त्याची सर्व गाणी हिंदीमध्ये गाण्यास सुरुवात करेल.' अनेकांना हा एडचा व्हिडिओ आवडत आहे.
हेही वाचा :