मुंबई : अभिनेत्री- डान्सर नोरा फतेही तिच्या डान्समुळे खूप प्रसिद्ध आहे. दोन आठवड्यांपूर्वीच, अमेरिकन गायक जेसन डेरुलोबरोबर तिचे नवीन गाणे 'स्नेक' रिलीज झाले. या गाण्यानं सध्या इंटरनेटवर धुमाकूळ घातला आहे. 'स्नेक' गाणं अवघ्या 24 तासांत सर्वाधिक पाहिले जाणारे दुसरे गाणे बनले आहे. हे गाणं रोझ आणि ब्रुनो मार्सच्या 'एपीटी'पासून फक्त एक पाऊल दूर आहे. रिपोर्ट्सनुसार, नोरा फतेही आणि जेसन डेरुलो यांचा नवीन म्युझिक व्हिडिओ 'स्नेक' हा 24 तासांत जगभरात सर्वाधिक पाहिला गेल्यानंतर आता तिचे चाहते खुश आहेत. या गाण्याला टॉप 2 रँकिंग मिळवली आहे. 'स्नेक' गाण्याला 8 कोटींहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. प्रदर्शित झालेले हे गाणं यूट्यूब म्युझिक व्हिडिओंच्या यादीत टॉप 4 मध्ये आहे. आता 'स्नेक' गाणं हिट झाल्यानंतर नोराची प्रतिक्रिया समोर आली आहे.
'स्नेक' गाण्याबद्दल नोरा फतेहीनं व्यक्त केल्या भावना : एका मीडिया मुलाखतीत, नोराला या गाण्याबद्दल विचारण्यात आलं. यावेळी तिनं म्हटलं, "हे माझ्यासाठी पूर्णपणे अविश्वसनीय आहे.' 'स्नेक' जागतिक स्तरावर टॉप 2मध्ये पोहोचणे, हा माझ्यासाठी आणि टीमसाठी एक खास क्षण आहे. ब्रुनो मार्स आणि रोझे सारख्या कलाकारांबरोबर तिथे असणे एक सन्मान आहे. यावरून असे दिसून येते की, लोक खरोखरच माझ्या आंतरराष्ट्रीय संगीत कारकिर्दीला स्वीकारत आहेत. हेच माझ्यासाठी सर्वस्व आहे. मी या गाण्यासाठी खूप मेहनत केली आहे. म्हणूनच जगभरातील लोक याच्याशी जोडले जात आहेत. हे खरोखर खूप चांगले आहे."
नोरा आणि जेसनची केमिस्ट्री : नोरानं तिच्या प्रत्येक यश आणि अनुभवाबद्दल सांगत म्हटलं, 'नक्कीच, यशाबरोबर थोडा दबाव येत असतो, पण मी ते दबाव म्हणून नाही तर प्रेरणा म्हणून पाहत असते. मला नेहमीच पुढं जायचं आहे आणि माझ्या चाहत्यांना काहीतरी नवीन सादर करायचे आहे. या जागतिक कामगिरीमुळे चांगले काम करण्याची आवड आणखी बळकट झाली आहे. माझ्या कारकिर्दीतील एका नवीन चॅप्टरसाठी चीयर्स.' नोराचा 'स्नेक' व्हिडिओ हा अनेकांना पसंत पडत आहेत. अनेकजण नोरा आणि जेसन डेरुलोच्या अद्भुत केमिस्ट्रीचे कौतुक करत आहेत. या दोघांची जोडी सध्या सोशल मीडियावर धमाल करत आहे.
हेही वाचा :