मुंबई - Parineeti Chopra Singing : परिणीती चोप्राच्या 'अमर सिंग चमकीला' चित्रपटात दिलजीत दोसांझ बरोबर पंजाबी गाणं गाताना दिसणार आहे. या बातमीनंतर इंटरनेटवर प्रतिक्रियांचा भडिमार झाला आहे. यापूर्वी तिनं गायनात आपला हात आजमवला असतानाही इम्तियाज अली दिग्दर्शित आगामी संगीतमय 'अमर सिंग चमकिला' चित्रपटाच्या ट्रेलर लॉन्च प्रसंगी तिनं गायन सादर केलं. तिच्या या गाण्याला नेटिझन्सकडून संमिश्र प्रतिसाद मिळाला आहे. दिलजीत बरोबर स्टेजवर थेट पंजाबी गाणे परफॉर्म करणाऱ्या परिणीतीला टीका आणि प्रशंसा दोन्हीचा सामना करावा लागला.
इंस्टाग्रामवरील युजर्सच्या मतांकडे एक नजर टाकल्यालावर या प्रतिक्रियातील विविधता समजते. एकानं लिहिलं, "छान छुपी प्रतिभा दडली आहे...तुझ्याकडेच जपून ठेव." दुसऱ्या एकानं एक क्लासिक गाण्याचा संदर्भ देत लिहिलं, "आज गाने की जिद्द ना करो" आणि पुढं त्यानं उपहासानं अश्रू आणणारे हास्य इमोजी टाकला आहे. आणखी एकानं तिच्या गाण्याबद्दल लिहिताना म्हटलं, "तिच्या गाण्याबद्दल एका शब्दात सांगायचं तर : 'थांब' आता."
परिणीतीच्या गायनादरम्यान दिलजीत दोसांझच्या चेहऱ्यावर उमटलेले भावही काही नेटिझन्सनी टिपले आहेत. काही जणांनी म्हटलं की, "तिचं गाणं पाहून त्याचा चेहराच काय बोलायचं ते बोलून गेला." तिची चुलत बहीण मन्नारा चोप्राच्या गायनाशी आणि अगदी ज्येष्ठ संगीतकार अनु मलिक यांच्याशीही परिणीतीच्या गाण्याची तुलना करण्यात आली. अशा प्रकारे परिणीतीला धारेवर धरण्याचा प्रयत्न नेटिझन्सनी केला आहे.
अशी एका बाजूला परिणीतीवर टीका होत असताना तिची बाजू घेणारे, प्रशंसा करणारेही काही कमी लोक नाहीत. एका युजरनं तिच्या प्रतिभेची कबुली दिली, "ती खरं तर चांगली गाते, पण प्रामाणिकपणे, सांगायचं तर आज ती चांगली गायली नाही," असे आदरानं म्हटलंय. दुसऱ्याने आश्चर्य व्यक्त केले, "वाह! इतका अप्रतिम आवाज. दिलजीत सुद्धा दंग झाला आहे." संमिश्र स्वागत झाल्यानंतरही काही श्रोत्यांनी तिच्या परफॉर्मन्सचे कौतुक केलं आणि, "ती चांगले गाते आहे" अशी कमेंट केली.
2017 च्या 'मेरी प्यारी बिंदू' या चित्रपटातील 'मान के हम यार नहीं' या रोमँटिक हिट गाण्यानं परिणीतीचा संगीत प्रवास सुरू झाला होता. शास्त्रीय गायनाचं प्रशिक्षण घेतलेली परिणीती चोप्रा आगामी म्यूझिकल फिल्ममध्ये दिग्गज पंजाबी गायक अमर सिंग चमकीलाची मैत्रीण अमरजोत कौरची भूमिका साकारणार आहे.
अमर सिंग चमकिला यांनी 1980 च्या दशकात गरिबीतून वर येत लोकप्रिय पंजाबी गायक म्हणून स्वतःला प्रस्थापित केलं होतं. तो केवळ 27 वर्षाचा असताना त्याच्यावर एका कार्यक्रमाला पोहोचत असनाचा हल्ला झाला आणि यातच त्याचा दुःखद अंत झाला. त्याच्या जबरदस्त लाईव्ह परफॉर्मन्ससाठी ओळखल्या जाणाऱ्या, चमकिलाचा वारसा पंजाबच्या संगीत इतिहासात अतुलनीय आहे. "अमर सिंग चमकीला" हा चित्रपट नेटफ्लिक्स इंडियावर १२ एप्रिल रोजी रिलीज होणार आहे.
हेही वाचा -
- साऊथ सुपरस्टार्सना अभिनयाचं आव्हान देणारा अभिनेता डॅनियल बालाजीचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन - Daniel Balaji Passes Away
- अक्षय कुमार स्टारर 'खेल-खेल में'मधून फरदीन खान करणार कमबॅक - fardeen khan
- 'द ग्रेट इंडियन कपिल शो' नेटफ्लिक्सवर आज स्ट्रीमिंग होईल, पाहा प्रोमो - the great indian kapil show