Oscars 2024 : 96 व्या ऑस्कर पुरस्कार 2024चा दिवस आता जवळ येत आहेत. हा मेगा इव्हेंट सुरू होण्यासाठी 4 दिवस उरले आहेत. दरम्यान भारतात प्रेक्षक 11 मार्च रोजी सोमवारी संध्याकाळी 4.00 वाजल्यापासून ऑस्कर अवॉर्ड डिज्नी हॉटस्टार पाहू शकेल. याआधी ऑस्कर अवॉर्ड्स सादर करणाऱ्यांची यादी समोर येत आहे. 6 मार्च रोजी ऑस्करच्या तिसऱ्या फेरीसाठी सादरकर्त्यांची यादी जाहीर झाली आहे. ऑस्कर पुरस्कारांच्या दुसऱ्या फेरीच्या सादरकर्त्यांच्या यादीत कोणत्याही भारतीय सेलिब्रिटीचे नाव समाविष्ट नाही. 96 व्या ऑस्कर सोहळ्याचं सूत्रसंचालन कॉमेडियन जिमी किमेल करणार आहे. जिमी तीन वर्षांनंतर पुन्हा एकदा ऑस्कर पुरस्कार सोहळ्याचे सूत्रसंचालन करताना दिसणार आहे. ऑस्कर अकादमी पुरस्कार 10 मार्च 2024 रोजी होईल.
96 व्या ऑस्कर पुरस्कार :विजेत्यांना लॉस एंजेलिस, कॅलिफोर्निया येथील डॉल्बी थिएटरमध्ये ऑस्कर अवार्ड प्रदान करण्यात येणार आहे. दरम्यान आज 6 मार्च रोजी, डिस्ने प्लस हॉटस्टारच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटनं या वर्षीच्या ऑस्कर-नामांकित चित्रपटांची रील शेअर केला आहे. रीलमध्ये 'किलर्स ऑफ द फ्लॉवर मून', 'ओपेनहायमर', 'बार्बी', 'मेस्ट्रो', 'पुअर थिंग्ज' आणि 'अमेरिकन फिक्शन' यासह अनेक नामांकित चित्रपटांच्या क्लिप दाखवण्यात आल्या आहेत. दरम्यान क्रिस्टोफर नोलनचा ब्लॉकबस्टर बायोपिक 'ओपेनहायमर' अनेक ऑस्कर जिंकण्यासाठी सज्ज आहे ,कारण या चित्रपटाला अनेक श्रेणींमध्ये नामांकन मिळालं आहे. सिलियन मर्फीच्या चित्रपटाला 13 श्रेणींमध्ये नामांकन मिळालं आहे. 'बार्बी', 'पूअर थिंग्ज' आणि 'किलर्स ऑफ द फ्लॉवर मून' हे आणखी काही नामांकित चित्रपट आहेत.