महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

'नॅशनल जिजू' निक जोनासबरोबर ओरीने दिली 'त्याची'च सिग्नेचर पोज - ओरी अवत्रामणी

उदयोन्मुख सेलेब्रिटी ओरी अवत्रामणीने जोनास बंधूंसाठी नताशा पूनावालाने आयोजित केलेल्या स्टार स्टडेड पार्टीमधील फोटोंची एक स्ट्रिंग शेअर केली आहे. तो निकसोबत त्याच्या लोकप्रिय पेटंट स्टाईलमध्ये 'नॅशनल जिजू'च्या छातीवर एक हात ठेवून पोज देताना दिसत आहे.

Nick Jonas
'नॅशनल जिजू' निक जोनाससोबत ओरी

By ETV Bharat Marathi Team

Published : Feb 2, 2024, 9:40 AM IST

Updated : Feb 2, 2024, 10:16 AM IST

मुंबई - ग्लोबल स्टार प्रियांका चोप्राचा गायक पती निक जोनासचा भारतातील दौरा अनेक कारणांनी गाजतोय. त्याची बहारदार मैफिल पहिल्यांदाच मुंबईत पार पडली. यावेळी बॉलिवूडसह असंख्य सेलेब्रिटींनी हजेरी लावून कॉन्सर्टचा मंत्रमुग्ध करणारा अनुभव घेतला. लोल्लापालूझा इंडिया 2024 च्या मंचावरुन गाताना भारताचा जावई असलेल्या निक जोनासला तमाम सेलेब्रिटींनी 'जीजू' या नावानेच हाक मारली. यामुळे तो अघोषित 'नॅशनल जिजू' बनला होता. या कार्यक्रमानंतर निक ब्रदर्स 'जीवाची मुंबई' करण्यासाठी नताशा पूनावालाच्या घरी पोहोचले. या स्टार स्टडेड पार्टीमध्ये सोशल मीडिया सेलिब्रेटी ओरी अवत्रामणीही सहभागी झाला होता.

नताशा पूनावालाने ही पार्टी निक जोनास, केविन जोनास आणि जो जोनास यांच्या स्वागतासाठी आयोजित केली होती. ओरीने नुकताच त्याच्या इंस्टाग्रामवर पार्टीतील काही फोटो शेअर केले आहेत.

पहिल्या फोटोत निक त्याच्या शेजारी उभा असताना ओरी त्याच्या ट्रेडमार्क स्टाईलची पोझ दाखवत आहे. फोटोमध्ये जो जोनास आणि अदार पूनावाला देखील दिसत आहेत. इतर फोटोमध्ये, तो तानिया श्रॉफ, मलायका अरोरा, भूमी पेडणेकर आणि तिची बहीण समिक्षा पेडणेकर, अदिती राव हैदरी आणि सुझैन खानसोबत दिसत आहे.

या रंगीत पार्टीत प्रत्येकाने कलरफुल कपडे परिधान केले असले तरी पार्टीच्या रंगीबेरंगी वातावरणात ओरीने पांढरे कपडे परिधान केले होते. यावर लिहिलं होतं, "YOLO You only love Orry." त्याने फोटोंना दिलेले कॅप्शन लक्ष वेधणारं होतं. त्याने लिहिले, "प्रत्येकजण पोज देतोय, परंतु ते माझ्यासारखे पोज देताहेत."

या पार्टीत निकने पॅटर्नचा पिवळा कॉर्ड सेट परिधान केला होता. जो जोनासने डेनिम शर्ट आणि गडद निळा ट्राउझर्स निवडल होता , तर केविन जोनासने पट्टेदार शर्ट आणि जीन्सच्या खाली तपकिरी टी-शर्ट घातला होता.

निक जोनास आणि त्याच्या भावांनी 27 जानेवारी रोजी लोल्लापालूझा इंडिया उदघाटनाच्या दिवशी परफॉर्मन्स सादर केला. मैफिलीनंतर ते पूनावाला हवेलीकडे स्वागत स्वागतासाठी गेले. जोनास ब्रदर्स व्यतिरिक्त, मलायका अरोरा, सुझैन खान, अमृता अरोरा, अदिती राव हैदरी आणि तानिया श्रॉफ पूनावालाच्या मुंबईती पार्टीत सहभागी झाले होते.

या शोसाठी प्रियांका चोप्रा निकसोबत भारतात आली नव्हती. तथापि, तिने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर इव्हेंटचा एक व्हायरल व्हिडिओ अपलोड केला आणि निकला इतक्या प्रेमळपणे शुभेच्छा दिल्याबद्दल मुंबईचे आभार मानले. तिने लिहिले, "माझे हृदय... धन्यवाद, मुंबई." तापसी पन्नू आणि दीपिका पदुकोण यांनीही निकने शहरात परफॉर्म केल्याबद्दल आनंद व्यक्त केला.

हेही वाचा -

  1. "हृतिक रोशनपेक्षा माझा प्रवास वेगळा" : स्टारडमच्या मुद्द्यावर शाहिद कपूरची प्रतिक्रिया
  2. धर्मेंद्रची नात निकिता चौधरी थाटामाटात अडकली लग्नबेडीत; फोटो व्हायरल
  3. शौर्य आणि बलिदानाचं महाकाव्य 'छत्रपती संभाजी' चित्रपट २ फेब्रुवारीला चित्रपटगृहात
Last Updated : Feb 2, 2024, 10:16 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details