मुंबई : बॉलिवूडची 'पद्मावती' दीपिका पदुकोण आज 5 जानेवारी रोजी 39वा वाढदिवस साजरा आहे. 2007 मध्ये 'ओम शांती ओम' या चित्रपटाद्वारे तिनं बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. आज दीपिका बॉलिवूडमधील सर्वाधिक मानधन घेणाऱ्या अभिनेत्रींपैकी एक आहे. दीपिकानं तिच्या करिअरमध्ये एकामागून एक हिट चित्रपट बॉक्स ऑफिसवर दिले आहेत. आता तिच्या वाढदिवसानिमित्त आम्ही तुम्हाला तिच्या 5 चित्रपटांबद्दल सांगणार आहोत.
ओम शांती ओम (2007) : दीपिकाचा पहिला चित्रपट 'ओम शांती ओम' हा सुपरहिट चित्रपट आहे. पहिल्याच चित्रपटात दीपिकानं शांती आणि संध्या या दोन भूमिका साकारल्या होत्या. याशिवाय शाहरुख खाननं देखील या चित्रपटात दोन भूमिका साकारल्या होत्या. ती तिच्या पहिल्या भूमिकेत अभिनेत्री आणि दुसऱ्या भूमिकेत संघर्ष करणारी अभिनेत्री बनली होती. हा चित्रपट हिट झाला आणि दीपिकाचं नशीबही उजळलं.
ये जवानी है दिवानी (2013) : 2013मध्ये दीपिकानं रणबीर कपूरबरोबर 'ये जवानी है दिवानी' या चित्रपटात काम केलं होतं. या चित्रपटात दीपिकानं नयना तलवारची भूमिका साकारली होती, जी तिच्या चाहत्यांना खूप आवडली होती. दीपिकाचा हा चित्रपटही हिट ठरला. या चित्रपटामध्ये आदित्य रॉय कपूर, कुणाल रॉय कपूर आणि कल्की कोचलिन यांच्याही विशेष भूमिका होत्या.
पीकू (2015) : दीपिका पदुकोणच्या कारकिर्दीतील सर्वोत्कृष्ट चित्रपट असेल तर तो म्हणजे शुजित सरकार दिग्दर्शित 'पिकू' हा कॉमेडी ड्रामा आहे. या चित्रपटातील दीपिकाची भूमिका प्रेरणादायी होती. या चित्रपटामध्ये दीपिका ही आपल्या वृद्ध वडिलांची सेवा करण्यात आपले आयुष्य घालवते. चित्रपटात अमिताभ बच्चन यांनी दीपिकाच्या वडिलांची भूमिका साकारली आहे, ज्यांना कब्जचा त्रास असतो. या चित्रपटात दिवंगत अभिनेता इरफान खानची भूमिकाही खूप दमदार आहे.
पद्मावत (2018) : दीपिकाच्या कारकिर्दीतील आणखी एक हिट चित्रपट 'पद्मावत' आजही अनेकांना खूप आवडतो. या चित्रपटात दीपिकानं आपल्या शब्दावर ठाम राहणाऱ्या राणी पद्मावतची भूमिका साकारली होती. हा एक पीरियड ड्रामा असून, यामध्ये दीपिकाचं पात्र राणी पद्मावती जोहर देऊन अलाउद्दीन खिलजीच्या तावडीतून सुटते. या चित्रपटात शाहिद कपूर आणि रणवीर सिंगची हे देखील होते.
छपाक (2020) : 2020 मध्ये रिलीज झालेला 'छपाक' हा चित्रपट मेघना गुलजार यांनी दिग्दर्शित केला होता. या चित्रपटात दीपिकानं लक्ष्मी अग्रवालची भूमिका साकारली होती. जी खऱ्या आयुष्यात ॲसिड हल्ल्याची शिकार झाली होती. 'छपाक' चित्रपटात मालती अग्रवाल या नावानं दीपिकानं भूमिका साकारली होती. या चित्रपटातील दीपिकाचा लूक ॲसिड पीडितेसारखा होता.
हेही वाचा :