मुंबई - Rakul Preet Singh and Jackky Bhagnani : अभिनेत्री रकुल प्रीत सिंग आणि जॅकी भगनानी नुकतेच लग्न करून त्यांच्या घरात स्थायिक झाले आहेत. रकुल-जॅकीनं 21 फेब्रुवारी रोजी गोव्यात लग्न केलंय. त्याचा हा विवाह सोहळा खूप चर्चेत होता. या जोडप्यांच्या लग्नातील अनेक फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. रकुल आणि जॅकीच्या लग्नात अनेक सेलेब्सनं हजेरी लावली होती. या जोडप्याला त्याच्या सुखी संसारासाठी अनेकांनी शुभेच्छा दिल्या आहेत. आता नवविवाहित जोडपे आता त्यांच्या नव्या वैवाहिक जीवनाचा आनंद घेताना दिसत आहे. रकुल आणि जॅकीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
रकुल आणि जॅकीचा डान्स व्हिडिओ व्हायरल :रकुल आणि जॅकीनं हा व्हिडिओ आज 4 मार्च रोजी इन्स्टाग्राम सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये हे जोडपे 'बडे मियाँ छोटे मियाँ' चित्रपटातील 'मस्त मलंग झूम' या पार्टी गाण्यावर जोरदार डान्स करत आहे. व्हिडिओत रकुल आणि जॅकीनं काळ्या रंगाचा पोशाख परिधान केला आहे. हे जोडपे एकत्र खूप सुंदर दिसत आहे. या जोडप्याचा हा व्हिडिओ अनेकांना आवडत आहे. अनेकजण व्हिडिओवर प्रतिक्रिया देऊन रकुल आणि जॅकीवर प्रेमाचा वर्षाव करताना दिसत आहेत. व्हिडिओत लग्नानंतर या जोडप्याच्या चेहऱ्यावर एक वेगळीच चमक दिसून येत आहे.