महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

रणबीर कपूरचे सोशल मीडिया अकाउंट लीक

Ranbir Kapoor : अभिनेता रणबीर कपूर सोशल मीडिया अकाउंट लीक झालं आहे. सायबर डिटेक्टिव्हनं त्याचं अकाउंट शोधून काढलं आहे.

Ranbir Kapoor
रणबीर कपूर

By ETV Bharat Marathi Team

Published : Feb 25, 2024, 3:55 PM IST

मुंबई Ranbir Kapoor :अभिनेता रणबीर कपूरचा 'ॲनिमल' या चित्रपटासाठी चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव होत आहे. दरम्यान, नुकतीच रणबीरबाबत एक बातमी समोर आली आहे, जी ऐकून तुम्हाला धक्का बसेल. रणबीर कपूर सोशल मीडियापासून दूर राहतो हे तुम्हा सर्वांना माहीत आहे. सोशल मीडियावर इंस्टाग्राम आणि एक्सवर या कोणत्याही प्लॅटफॉर्मवर त्याचे अकाउंट नाही. मात्र, त्याच्या नावावर अनेक फॅन पेजेस पाहायला मिळतील. पण आता तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल की रणबीर कपूरचं एक गुप्त इंस्टाग्राम अकाउंट आहे आणि याद्वारे तो लोकांच्या सोशल मीडियावर लक्ष ठेवतो.

रणबीर कपूरचे गुप्त इंस्टाग्राम अकाउंट आहे? : अलीकडे आपण अशा बातम्या ऐकायला मिळत होत्या की, रणबीर कपूर एका गुप्त इंस्टाग्राम अकाउंटवरून प्रत्येक गोष्टीवर लक्ष ठेवतो. आता त्याच्या या गुप्त इंस्टाग्राम अकाउंटवर काही चाहते दावा करत आहेत, की तो याद्वारे सोशल मीडियावर काय सुरू आहेत हे पाहतो. रणबीरचे इंस्टाग्राम अकाउंट हँडल 'रेमार 1528' या नावानं असल्याचं बोलल जात आहे. इतकंच नाही तर रणबीरचा मित्र अयान मुखर्जीही या अकाऊंटला फॉलो करतो. रणबीर या अकाउंटवरून अनुराग बसू आणि संदीप रेड्डी वंगा यांना फॉलो करतो. काही यूजर्सनी असेही सांगितले की, रणबीरचे हे अकाऊंट 2016 मध्ये तयार करण्यात आले होते.

रणबीर कपूरचे सोशल मीडिया अकाउंट लीक : यावेळी रणबीर कपूरनं आलिया भट्टला डेट करण्यास सुरुवात केली होती. या अकाउंटच्या यूजर आईडीमध्ये 15 आणि 28 आहे. आलिया आणि रणबीर जन्मतारीख (15 मार्च आणि 28 सप्टेंबर) आहेत. आता सायबर डिटेक्टिव्हनं रणबीर कपूरचं एक्स हँडलही शोधून काढले आहे. रणबीरनं आस्क माहिरा (#AskMahira) सत्रादरम्यान माहिरा खानबरोबर संभाषणही केलं होतं. माहिराबरोबरच्या चॅटिंगचे काही स्क्रीनशॉटही चाहत्यांना सापडले आहेत, जे सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. आता 'रेमार 1528' इन्स्टाग्राम अकाऊंट रणबीरचे आहे की नाही, याबद्दल तो सांगू शकेल. दरम्यान रणबीर कपूरच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचं झालं तर, तो सध्या नितेश तिवारीच्या 'रामायण' चित्रपटासाठी चर्चेत आहे. या चित्रपटात तो भगवान रामाची भूमिका साकारणार आहे.

हेही वाचा :

  1. दीपिका पदुकोणचा बाफ्टा 2024 मधील ब्रॅडली कूपर आणि किलियन मर्फीबरोबरचा फोटो व्हायरल
  2. जॅकी भगनानीबरोबर लग्नानंतर रकुल प्रीत सिंगची पहिली 'रसोई'
  3. टायगर श्रॉफच्या परफॉर्मन्सनं वुमन्स प्रीमियर लीग २०२४ च्या प्रेक्षकांना घातली भुरळ

ABOUT THE AUTHOR

...view details