महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

अनंत अंबानींच्या लग्नाला नयनताराची हजेरी, कॅप्टन कूलसह साक्षीबरोबरचा फोटो केला शेअर - NAYANTHARA NEWS - NAYANTHARA NEWS

Nayanthara with MS Dhoni Sakshi : नयनतारानं एमएस धोनी आणि त्याची पत्नी साक्षीबरोबरचा एक फोटो शेअर केला आहे. या फोटोला चाहते भरभरून प्रेम देत आहेत.

Nayanthara with MS Dhoni Sakshi
नयनतारा एमएस धोनी आणि साक्षीबरोबर (नयनतारा (ANI))

By ETV Bharat Marathi Team

Published : Jul 14, 2024, 1:10 PM IST

मुंबई - Nayanthara with MS Dhoni Sakshi : साऊथची सुपरस्टार लेडी नयनतारा आणि तिचा पती चित्रपट निर्माता विघ्नेश शिवन यांनी अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या लग्नाला हजेरी लावली. अलीकडेच तिनं लग्नात घालवलेले काही खास क्षणाचे फोटो चाहत्यांबरोबर शेअर केले आहेत. तिनं क्रिकेट दिग्गज एमएस धोनी आणि त्याची पत्नी साक्षी धोनी यांच्याबरोबर सुंदर फोटो शेअर करत लिहिलं, "माही सर, साक्षी सिंह मॅडम तुमच्या दोघांचं निर्मळ प्रेम आहे. देवाचा तुमच्यावर सदैव आशीर्वाद राहू दे." नयनतारानं शेअर केलेला फोटो अनेकांना आवडत आहेत. या फोटोवर अनेकजण आपल्या प्रतिक्रिया देऊन एमएस धोनी आणि साक्षीचं कौतुक करताना दिसत आहेत. नयनतारा शाहरुख खानबरोबर 'जवान' या ब्लॉकबस्टर चित्रपटात दिसली होती.

अनंतच्या लग्नामधील फोटो नयनतारानं केले शेअर : या चित्रपटातील तिच्या अभिनयाचे खूप कौतुक करण्यात आलं होतं. खासकरून 'चलेया' या गाण्यात किंग खानबरोबरची तिची केमिस्ट्री ही खूप खास होती. यासाठी तिचे चाहत्यानंदेखील कौतुक केलं होते. अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या लग्नाला अनेक बॉलिवूड आणि आंतरराष्ट्रीय सेलिब्रिटी उपस्थित होते. हॉलिवूड अभिनेत्री किम कार्दशियन, ख्लो कार्दशियन आणि जॉन सीना यांनीदेखील या लग्नात येऊन शोभा वाढवली होती. तसेच लग्नात बच्चन कुटुंब, रजनीकांत यांचे कुटुंब, सलमान खान, शाहरुख खान, प्रियांका चोप्रा, निक जोनास, विकी कौशल, महेश बाबू, कतरिना कैफ, रणबीर कपूर, आलिया भट्ट, दीपिका पदुकोण, रणवीर सिंग आणि जान्हवी कपूर, सारा यांच्यासह बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटींनी खूप धमाल केली.

अनंत आणि राधिकाचं रिसेप्शन :अनंत आणि राधिका यांनी आज 14 जुलै रोजी मुंबईत रिसेप्शन पार्टी आयोजित केली आहे. हे सेलिब्रेशन खूप भव्य असणार आहे. या पार्टीमध्येदेखील चित्रपटसृष्टीतील कलाकार विविध कार्यक्रमात भाग घेणार आहे. या लग्नामधील काही व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याशिवाय 13 जुलै रोजी राधिकाच्या गृहप्रवेशाचा कार्यक्रम भव्यपणे साजरा करण्यात आला. या कार्यक्रमामधील अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

हेही वाचा :

  1. अनंत अंबानी - राधिका मर्चंट यांचा विवाह लावणाऱ्या पंडितानं घेतली 'इतकी' दक्षिणा - Anant Radhika Wedding
  2. अनंत अंबानीच्या लग्नात बाबा रामदेव थिरकले, डान्स व्हिडिओ व्हायरल - Baba Ramdev Dance Video Viral
  3. अनंत-राधिकाच्या लग्नात अमिताभ आणि जया बच्चनच्या पाया पडला शाहरुख खान - Anant Radhika Wedding

ABOUT THE AUTHOR

...view details