मेलबर्न Virat Kohli at Airport : दिग्गज भारतीय फलंदाज विराट कोहली सध्या ऑस्ट्रेलियात आहे जिथं तो बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी खेळत आहे. गाबा कसोटी सामना संपल्यानंतर भारतीय संघ आता मेलबर्नला पोहोचली आहे आणि तिथं पोहोचताच विराट कोहली मोठ्या वादात सापडला आहे. खरंतर, विराट कोहली मेलबर्नला पोहोचताच एका महिला पत्रकारासोबत त्याचा वाद झाला. विराट कोहली विमानतळावर महिला रिपोर्टरशी बराच वेळ वाद घालत राहिला. आता प्रश्न असा आहे की विराट कोहलीला महिला पत्रकाराचा राग का आला? खरंतर, ऑस्ट्रेलियन पत्रकारांनी विराट कोहलीच्या मुलांचे फोटो काढले, त्यानंतर विराट संतापला.
विराट कोहलीचा महिला पत्रकाराशी वाद : विराट कोहलीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये तो एका महिला पत्रकाराशी बोलत आहे. विराट बोलत असताना खूप रागात दिसत आहे. यानंतर विराट कोहलीनं ऑस्ट्रेलियन पत्रकारांना सांगितलं की, तुम्ही लोक माझ्या परवानगीशिवाय माझ्या मुलांचे फोटो काढू शकत नाही. तथापि, स्थानिक चॅनल 7 नं दावा केला आहे की त्यांच्या मुलांचे कोणतेही फोटो क्लिक केले गेले नाहीत किंवा त्यांचे व्हिडिओ बनवले गेले नाहीत. विराट कोहलीनं सर्वांना सांगितलं की त्याला गोपनीयतेची आवश्यकता आहे आणि त्याच्या परवानगीशिवाय कोणीही त्याचा व्हिडिओ बनवू शकत नाही.
Indian cricket superstar Virat Kohli has been involved in a fiery confrontation at Melbourne Airport. @theodrop has the details. https://t.co/5zYfOfGqUb #AUSvIND #7NEWS pic.twitter.com/uXqGzmMAJi
— 7NEWS Melbourne (@7NewsMelbourne) December 19, 2024
ऑस्ट्रेलियान मीडियाची विराटवर टीका : विराट कोहलीच्या ऑस्ट्रेलियन पत्रकार आणि फोटो पत्रकारांशी झालेल्या वादाचा मुद्दा संपूर्ण ऑस्ट्रेलियात गाजला आहे. ऑस्ट्रेलियन मीडिया विराट कोहलीवर टीका करत आहे. मात्र, विराट आणि ऑस्ट्रेलियन मीडियाचे संबंध नेहमीच चांगले राहिले नाहीत. पहिल्याच दौऱ्यातही तो ऑस्ट्रेलियन मीडियामुळं अडचणीत आला होता. पण यावेळी मुद्दा वेगळा आहे.
मेलबर्न कसोटी कधी होणार : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील चौथा कसोटी सामना 26 डिसेंबरपासून मेलबर्न इथं खेळवला जाणार आहे. कसोटी मालिका सध्या 1-1 अशी बरोबरीत आहे. भारतानं पर्थ कसोटी जिंकली. ॲडलेडमध्ये ऑस्ट्रेलिया जिंकला. ब्रिस्बेन कसोटी सामना अनिर्णित राहिला. आता मेलबर्नमधील कसोटी जिंकत मालिकेत कोण आघाडी घेणार हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.
हेही वाचा :