मुंबई: राजकुमार हिरानी यांचा 'मुन्नाभाई एमबीबीएस' चित्रपट आता देखील लोकांना खूप आवडतो. या चित्रपटामधील डायलॉग खूप हिट ठरले आहेत. 'मुन्नाभाई एमबीबीएस' हा चित्रपट फक्त डॉक्टर होण्याची कहाणी नाही, तर ती प्रेम, मैत्री, चुका सुधारणे आणि आयुष्यातील छोट्या-छोट्या क्षणांमध्ये आनंद घेणे यावर आधारित आहे. या चित्रपटामध्ये खूप चांगला सामाजिक संदेश दिला गेला आहे. 'मुन्नाभाई एमबीबीएस' चित्रपटात मुन्नाभाईच्या आनंदी आणि मन जिंकण्याच्या शैलीचे खूप चांगले वर्णन केले गेले आहे. वीस वर्षांनंतरही या चित्रपटातील मजेदार आणि वेगळे डायलॉग ताजे आणि खास वाटतात. 'मुन्नाभाई एमबीबीएस' चित्रपटानं प्रेक्षकांच्या मनात एक वेगळीच छाप सोडली आहे.
'मुन्नाभाई एमबीबीएस' चित्रपटामधील खास डायलॉग
1) ऐ मामू... जादू की झप्पी दे डाल और बात खत्म
2) जब तुम स्माइल करता है ना... तो ऐसा लगता है कि क्या मस्त लाइफ है
3) लाइफ में जब टाइम कम रहता है ना… डबल जीने का, डबल
4) ऐ चिली चिकन तेरा हाइट क्या है रे, हाऊ लॉन्ग हाऊ लॉन्ग ?
5) भाई ने बोला करने का मतलब करने का
6) तुम बहुत मस्त काम करता है
7) बहुत कुछ लाइफ में फर्स्ट टाइम होता है रे
8) 6 फीट का एक है ना दो दो फीट के तीन बना डालूंगा
9) डॉक्टर बनना है तो डॉक्टर भी बन जा, पर इंसान बनना जरूरी है
10) फुल कॉन्फिडेंस में जानेका और एकदम विनम्रता के साथ बात करने का
'मुन्नाभाई एमबीबीएस' चित्रपटाची स्टार कास्ट : राजकुमार हिरानी यांच्या 'मुन्नाभाई एमबीबीएस' चित्रपटामधील गाणी देखील खूप लोकप्रिय झाली होती. 'मुन्नाभाई एमबीबीएस' हा चित्रपट आता आपली 21 वर्षे साजरी करत आहेत. या चित्रपटामध्ये संजय दत्तनं मुन्नाची भूमिका खूप चांगल्या पद्धतीनं साकारली होती. याशिवाय अर्शद वारसीनं चित्रपटात मुन्नाचा मित्र सर्किटची भूमिका केली होती. त्याच्या या भूमिकेनं त्याला खूप प्रसिद्धी मिळून दिली होती.
हेही वाचा :