महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

नाना पाटेकरनं 'वेलकम 3' नाकारला, केला मोठा खुलासा - NANA PATEKAR WELCOME 3 - NANA PATEKAR WELCOME 3

Nana Patekar Welcome 3 : 'वेलकम 3' चित्रपटात नाना पाटेकर का काम करणार नाही याचा खुलासा त्यानं आता केला आहे. आता या चित्रपटामध्ये काही नवीन चेहरे प्रेक्षकांना पाहिला मिळतील.

Nana Patekar Welcome 3
नाना पाटेकर वेलकम 3 ('वेलकम 3' (IMAGE- IANS))

By ETV Bharat Marathi Team

Published : Jun 25, 2024, 2:41 PM IST

मुंबई - Nana Patekar : विनोदी चित्रपटांमध्ये 'वेलकम' हा चित्रपट नेहमीच लक्षात सर्वांना असेलच. या चित्रपटातील सर्वात मजेदार विनोदी पात्र उदय शेट्टी (नाना पाटेकर) आणि मजनू भाई (अनिल कपूर) यांच्या भूमिका या खूप लोकप्रिय झाल्या होत्या. 'वेलकम 2'मध्ये 'वेलकम' सारखी मजा नव्हती. आता 'वेलकम 3' निर्मित केला जात आहे. यामध्ये अक्षय कुमारनं पुन्हा एन्ट्री केली आहे. 'वेलकम 2'मध्ये अक्षयच्या जागी जॉनला आणण्यात आलं होतं. आता नाना पाटेकर आणि अनिल कपूर दोघेही 'वेलकम 3' मध्ये नसतील. दरम्यान एका मुलाखतीत नाना पाटेकरनं 'वेलकम 3' चित्रपटात तो का नाही हे सांगितलं आहे.

नाना पाटेकरनं 'वेलकम 3' चित्रपटाला दिला नकार : अलीकडे नाना पाटेकर एका मुलाखतीत मोकळेपणानं बोलताना दिसला. यावेळी नानांनी त्यांच्या अल्टिमेट कॉमेडी चित्रपट 'वेलकम' (2007) बद्दल खुलेपणानं सांगितलं. हा चित्रपट हिट ठरल्याचं श्रेय नानांनी चित्रपटाचे दिग्दर्शक अनीस बज्मी यांना दिलं. 'वेलकम टू द जंगल'च्या तिसऱ्या भागात तो का नसेल त्यानं हेही सांगितलं. नानानं यावेळी सांगितलं, 2015 मध्ये रिलीज झालेला 'वेलकम 2 ' चालला नाही. यानंतर अहमद खानच्या 'वेलकम 3'मधून अनिल कपूरनं माघार घेतला. 'वेलकम 3'साठी त्यांनाही संपर्क करण्यात आला होता, मात्र त्यांनी नकार दिला. यानंतर त्यानं म्हटलं, "वेलकम 3'ची कहाणी मला काही विशेष वाटली नाही."

'वेलकम 3' हा चित्रपट कधी प्रदर्शित होणार? : 'वेलकम 3'मध्ये अक्षय कुमार, सुनील शेट्टी, आफताब शिवदासानी, अर्शद वारसी, परेश रावल, जॉनी लीव्हर, राजपाल यादव, तुषार कपूर, श्रेयस तळपदे, कृष्णा अभिषेक, किकू शारदा, मिका सिंग दलेर मेहंदी, राहुल देव, मुकेश तिवारी, शारीब हाशमी, यशपाल शर्मा, रवीना टंडन, लारा दत्ता, जॅकलिन फर्नांडिस, दिशा पटानी यांच्यासह 25 हून अधिक स्टार्स आहेत. हा चित्रपट 27 डिसेंबर 2024 रोजी प्रदर्शित होणार आहे. सध्या या चित्रपटाचं शूटिंग सुरू आहे. हा चित्रपट पाहण्यासाठी अनेकजण उत्सुक आहेत. यावेळी 'वेलकम 3'मध्ये प्रेक्षकांना आणखी काही नवीन पाहायला मिळेल अशी आशा अनेकजण करत आहेत.

हेही वाचा :

  1. 5 महिन्यांत जिममध्ये घाम गाळून 26 किलोपेक्षा कमी वजन केल्यानंतर जयदीप अहलावत केलं चाहत्यांना प्रभावित - JAIDEEP AHLAWAT
  2. खाऊ गल्लीत नीता अंबानींनी चाट समोस्यावर मारला ताव, चाटवाल्याला दिलं अनंत-राधिकाच्या लग्नाचं आमंत्रण - NITA AMBANI EAT VARANASI CHAAT
  3. शाहरुख खान लंडनमध्ये कुटुंबासह खेळला क्रिकेट, फोटो व्हायरल - shah rukh khan

ABOUT THE AUTHOR

...view details