लॉस एंजेलिस - Indian Cinema Music at Oscar Museum : कला, विज्ञान आणि चित्रपट निर्मितीमधील कलाकारांना समर्पित असलेले अकादमी म्युझियम ऑफ पिक्चर्स भारतीय चित्रपट आणि म्यूझिक साजरे करण्यासाठी सज्ज झालं आहे. अकादमी संग्रहालयाने सोशल मीडियावरील पोस्टद्वारे 'आरआर' (2022), 'स्लमडॉग मिलेनियर' (2008), आणि 'लगान' (2001) च्या संगीताचा उत्सव साजरा करण्यासाठी कार्यक्रमाची घोषणा केली आहे.
या दिवशी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे
तिन्ही चित्रपटांचे पोस्टर शेअर करण्याबरोबर कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, 'शनिवार, 18 मे रोजी संध्याकाळी 6:30 वाजता, आपण आरआरआर (2022), लगान (2001), 'स्लमडॉग मिलेनियर' (2008) ) चे महान संगीत साजरं केलं जाणार आहे. 18 मे रोजी सायंकाळी 6:30 वाजता होणाऱ्या या कार्यक्रमात बॉलिपॉप आणि सदूबांचा थेट तबला आणि नृत्य सादरीकरणाचा समावेश होईल. या कार्यक्रमामध्ये तिन्ही चित्रपटांचे संगीत सादर केले जाईल. विशेष म्हणजे एसएस राजामौली यांच्या राम चरण आणि ज्युनियर एनटीआर यांची भूमिका असलेल्या 'आरआरआर' मधील 'नाटू नाटू' या ट्रॅकने अकादमी पुरस्कार 2023 मध्ये सर्वोत्कृष्ट मूळ पुरस्कार जिंकला होता.