महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

सोनाक्षी सिन्हाचा 'दबंग' अवतार पाहून मुकेश खन्ना यांनी घेतला यू-टर्न, पोस्ट केली शेअर - RAMAYANA

मुकेश खन्ना यांनीही सोनाक्षी सिन्हाच्या पोस्टबाबत प्रतिक्रिया दिली आहे. त्यांची पोस्ट आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Mukesh Khanna and Sonakshi Sinha
सोनाक्षी सिन्हा आणि सोनाक्षी सिन्हा (Mukesh Khanna and Sonakshi Sinha - instagram)

By ETV Bharat Entertainment Team

Published : 6 hours ago

मुंबई - 'शक्तिमान' फेम अभिनेता मुकेश खन्ना पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. अलीकडेच एका मुलाखतीदरम्यान मुकेश खन्ना यांनी अक्षय कुमार, शाहरुख खान ते रणवीर सिंगसह अनेक स्टार्सवर भाष्य केलं होतं. यादरम्यान, त्यांनी बॉलिवूडची दबंग गर्ल सोनाक्षी सिन्हावरही निशाणा साधला होता. नुकत्याच एका मुलाखतीत मुकेश खन्ना यांनी सोनाक्षी सिन्हावर हिंदू महाकाव्य, रामायणबद्दल माहिती नसल्यामुळे टीका केली होती. मुकेश खन्ना यांनी तिच्या वडिलांच्या म्हणजेच शत्रुघ्न सिन्हा यांच्या संगोपनावर प्रश्नचिन्ह निर्माण केले होते. याबद्दल सोनाक्षीला खूप वाईट वाटलं होतं. यानंतर तिनं सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करून याबद्दल मुकेश खन्ना यांना प्रतिउत्तर दिलं होत.

मुकेश खन्ना दिलं सोनाक्षी सिन्हाला उत्तर : या पोस्टमध्ये तिनं तिच्या वडिलांच्या संगोपनावर प्रश्नचिन्ह निर्माण न करण्याचा सल्ला मुकेश खन्ना दिला होता. आता याप्रकरणी मुकेश खन्नानं सोशल मीडियाच्या माध्यामातून स्पष्टीकरण दिलं आहे. त्यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिलं, 'प्रिय सोनाक्षी, मला आश्चर्य वाटते की तू प्रतिक्रिया देण्यासाठी इतका वेळ घेतला. करोडपती शोच्या त्या प्रसंगावरून मी तुझे नाव घेऊन तुला नाराज करत होतो हे मला माहीत होतं. मात्र तुझी किंवा तुझ्या वडिलांची बदनामी करण्याचा माझा कोणताही हेतू नव्हता, ते माझे ज्येष्ठ आहेत आणि त्यांच्याशी माझे अतिशय चांगले संबंध आहेत.'

मुकेश खन्ना (mukesh khanna - instagram)

मुकेश खन्नाची पोस्ट चर्चेत : यानंतर मुकेश खन्ना यांनी पुढं लिहिलं, 'माझा एकमात्र उद्दिष्ट आजच्या पिढीवर प्रतिक्रिया देणे हा होता. आजकाल जग हे गुगल आणि मोबाईल फोनचे गुलाम बनले आहे. विकिपीडिया आणि युटुबवर मर्यादित माहिती असल्यानं त्याचं ज्ञान कमी आहे. माझ्याकडे तुमची एक हाय-फाय केस होती, जी मी इतरांना शिकवण्यासाठी वापरू शकेन, असं मला वाटलं होतं. वडील, मुले आणि मुलींना सांगण्यासाठी आपल्या संस्कृतीचा खूप मोठा इतिहास आणि अफाट ज्ञान आहे, जे आजच्या प्रत्येक तरुणानं जाणून घेतलं पाहिजे. मला माहित नाही, पण मला त्याचा अभिमान वाटतो. एवढेच.''

सोनाक्षी सिन्हाची पोस्ट : 'कौन बनेगा करोडपती' शोमध्ये सोनाक्षीला रामायणशी संबंधित एक प्रश्न विचारण्यात आला होता, ज्याचं ती बरोबर उत्तर देऊ शकली नाही. यानंतर तिच्यावर अनेक लोकांनी टीका देखील केली होती. मुकेश खन्ना यांनी नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत तिच्यावर टीका केल्यानंतर, सोनाक्षीनं तिच्या इंस्टाग्राम हँडलवर याबद्दल दु:ख व्यक्त केलं होतं. शत्रुघ्न सिन्हाच्या पालकत्वावरही प्रश्न उपस्थित झाल्यानंतर तिनं आपल्या पोस्टमध्ये मुकेश खन्नाची खरडपट्टी काढली होती. यापूर्वी देखील याप्रकरणी मुकेश खन्ना यांनी सोनाक्षीवर निशाणा साधला होता.

हेही वाचा :

  1. 'दबंग लेडी'नं 'शक्तिमान'ला दिला इशारा, म्हणाली...
  2. 19 वर्षांनंतर परतणार 'शक्तिमान', मुकेश खन्नाची घोषणा...
  3. Mukesh Khanna On Kashmir Files : मुकेश खन्नांनी केले 'द कश्मीर फाईल्स'चे कौतुक.. म्हणाले, 'आता जनताच..'

ABOUT THE AUTHOR

...view details