मुंबई : मुंबईतील समुद्रात बुधवारी मोठी दुर्घटना घडली. गेट ऑफ इंडियाजवळ घडलेल्या या दुर्घटनेमुळं किमान 13 जणांचा मृत्यू झाला आहे. नौदलाच्या बोटीत तांत्रिक बिघाड झाल्यामुळं त्या बोटीनं नीलकमल या फेरीबोटीला धडक दिली. या दुर्घटनेवर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी शोक व्यक्त केला आहे. तसंच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दुःख व्यक्त करुन मृतांच्या वारसांना तातडीची 5 लाखांची मदत जाहीर केली आहे.
मुख्यमंत्र्यांनी सांगितलं अपघाताचं कारण : "नौदलाच्या बोटीला नवीन इंजीन लावलं होतं. त्या इंजिनाची टेस्ट घेतली जात होती. त्या चाचणीच्या वेळी इंजीनमध्ये बिघाड झाला. त्यामुळं बोटीवरील ताबा गेला. त्यानंतर नौदलाची बोट नीलकमल बोटीवर आदळली, त्यामुळं हा अपघात झाला. या दुर्घटेत मृतांच्या नातेवाईकांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून 5 लाखाची मदत दिली जाईल" अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलीय.
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी या घटनेवर शोक व्यक्त केला आहे. त्यांनी सोशल मीडिया 'एक्स' प्लॅटफॉर्मवर लिहिलं की, "मुंबईतील प्रवासी फेरीबोट आणि भारतीय नौदलाची क्राफ्ट बोट यांच्यात झालेल्या अपघातामुळं धक्का बसला आहे."
I am shocked and saddened to learn of the accident involving a passenger ferryboat and an Indian Navy craft boat near Mumbai Harbour. My condolences to the families of those who have lost their lives. I pray for the swift success of the rescue and relief operations and a quick…
— President of India (@rashtrapatibhvn) December 18, 2024
बचावकार्याला वेग देण्याचे निर्देश : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या दुर्घटनेबाबत मुंबई शहर व रायगड जिल्हाधिकाऱ्यांकडून माहिती घेतली आहे. नौदल, जेएनपीटी, तटरक्षक दल आणि स्थानिक मच्छीमार बोटींच्या सहाय्यानं बचाव कार्याला वेग देण्याचे निर्देश देत सगळ्यांना सुरक्षित बाहेर काढण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले.
मुंबईत एलिफंटा परिसरात आज सायंकाळी प्रवासी बोट बुडाल्याची घटना घडली असून त्याबाबतच्या बचावकार्याची माहिती मुंबई शहर व रायगड जिल्हाधिकाऱ्यांकडून घेतली. नौदल, जेएनपीटी, तटरक्षक दल आणि स्थानिक मच्छीमार बोटींच्या सहाय्याने बचाव कार्याला वेग देण्याचे निर्देश देत दुर्घटनाग्रस्त बोटीतील…
— Eknath Shinde - एकनाथ शिंदे (@mieknathshinde) December 18, 2024
संरक्षणमंत्र्यांनीही अपघाताबद्दल व्यक्त केला शोक : संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी सोशल मीडिया 'एक्स' प्लॅटफॉर्मवर लिहिलं की, "मुंबई हार्बरमध्ये प्रवासी फेरी आणि भारतीय नौदलाची बोट यांच्यातील अपघातात जीवितहानी झाल्यामुळं दुःख झालं आहे. दोन्ही बोटींमधील नौदल कर्मचारी आणि नागरिकांसह जखमी जवानांना तातडीनं वैद्यकीय सेवा देण्यात येत आहे. भारतीय नौदल आणि तटरक्षक दलाकडून बचावकार्य सुरू आहे.
Deeply saddened by the loss of precious lives in the collision between passenger ferry and Indian Navy craft in Mumbai Harbour. Injured personnel, including naval personnel & civilians from both vessels, are receiving urgent medical care.
— Rajnath Singh (@rajnathsingh) December 18, 2024
My heartfelt condolences to the…
अतिशय दुर्दैवी घटना : "मुंबईतील समुद्रात आज एक अतिशय दुर्दैवी घटना घडली. बोट जिथून निघाली ते ठिकाण माझ्या विधानसभा मतदारसंघाचा भाग आहे. या घटनेचा सखोल तपास करावा आणि भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी उपाययोजना तयार कराव्यात," अशी मागणी विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी केली आहे.
#WATCH | Mumbai Boat Accident | Nagpur: Maharashtra Assembly Speaker Rahul Narwekar says, " ... a very unfortunate incident took place in the mumbai harbour today. the place from where the boat left, gateway of india, is a part of my assembly constituency... we have to carry out a… pic.twitter.com/LtPr54I22p
— ANI (@ANI) December 18, 2024
हेही वाचा