ETV Bharat / state

राज्यात कॉन्ट्रॅक्टर अन् एजंटांचं सरकार, काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाणांचा हल्लाबोल - PRITHVIRAJ CHAVAN

विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी कराड दक्षिणमध्ये कार्यकर्ता संवाद मेळावा घ्यायला सुरूवात केली आहे.

Prithviraj Chavan
पृथ्वीराज चव्हाण (File Photo)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Dec 18, 2024, 10:50 PM IST

सातारा : यशवंतराव चव्हाण यांचा विचार तात्पुरता लुप्त झाला असून राज्यात कॉन्ट्रॅक्टर आणि त्यांच्या एजंटांचं सरकार आलं असल्याचा हल्लाबोल काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केला. काँग्रेस नेहमीच संघर्षातून पुढे आली असून खरा कार्यकर्ता कधीही विचार सोडून जाणार नाही, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

आगामी निवडणुकांसाठी सज्ज राहा : विधानसभा निवडणुकीत झालेल्या पराभवानं खचून न जाता पृथ्वीराज चव्हाण यांनी बुधवारी कार्यकर्ता संवाद मेळावा आयोजित केला होता. कार्यकर्त्यांना संबोधित करताना पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, "चार महिन्यात अनेक घडामोडी होतील. राज्य सरकारची कृत्ये उघडकीस आल्यानंतर लोक आपला विचार बदलतील. काही दिवसात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका येऊ घातल्या आहेत. त्यासाठी काँग्रेस कार्यकर्त्यांनी सज्ज राहावे".

एकतर्फी निकालामुळं संशय : "लोकसभेनंतर चारच महिन्यात निवडणुकांचं चित्र असं वेगळं दिसेल, यावर कोणाचाच विश्वास बसत नाही, याचा पुनरुच्चार पृथ्वीराज चव्हाण यांनी कार्यकर्ता मेळाव्यात केला. आपण लोकशाहीवर विश्वास ठेवून निकाल स्वीकारला असला तरी एकूणच निवडणूक प्रक्रियेबद्दल संशयाचं वातावरण आहे. निवडणुकीत हार जीत होतेच. परंतु सरसकट राज्याचाच निकाल इतका एकतर्फी लागल्यानं मतदारांच्या मनात संशय निर्माण झाला आहे," असंही पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितलं.

काँग्रेसनेच देशात लोकशाही आणली : देशात काँग्रेसनेच लोकशाही आणली असून लोकशाही हा संविधानाचा आत्मा आहे. विधानसभा निवडणुकीनंतर लोकशाही जिवंत आहे का? हा लोकांच्या मनात प्रश्न आहे. पारदर्शक आणि मुक्त वातावरणात निवडणुका होत नाहीत. ईव्हीएम प्रक्रियेबद्दल प्रत्येकाला शंका आहे. त्यामुळं पुढील निवडणुका मतपत्रिकेवर व्हाव्यात, यासाठी काँग्रेसने सह्यांची देशव्यापी मोहीम हाती घेतली असल्याचं पृथ्वीराज चव्हाण म्हणाले.

छत्रपतींचं हिंदूत्व आम्हाला मान्य : शिवाजी महाराजांचं हिंदुत्व आम्हाला मान्य असून, हेच हिंदुत्व टिकवण्याची गरज काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस ॲड. उदयसिंह पाटील-उंडाळकर यांनी व्यक्त केली. ते पुढं म्हणाले, "विधानसभा निवडणुकीचं सिंहावलोकन करून पुढं जाणं आवश्यक आहे. सध्याच्या परिस्थितीत कार्यकर्त्यांनी संघर्षाची तयारी ठेवली पाहिजे".

राज्यभर निषेध आंदोलन करणार : केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांनी संसदेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केलं. त्यांच्या वक्तव्यातून भाजपा आणि आरएसएसचा खरा चेहरा आणि विचार पुढं आला आहे. यासंदर्भात काँग्रेस श्रेष्ठींकडून सूचना आल्यानंतर राज्यभर निषेध आंदोलन केलं जाईल.

हेही वाचा -

  1. 'जागतिक तज्ज्ञांकडून ईव्हीएमची तपासणी व्हावी': ईव्हीएमवरुन पृथ्वीराज चव्हाण यांचा गंभीर आरोप, माजी सरन्यायाधीशांवरही भडकले
  2. महाराष्ट्रात सत्ताबदल करण्यासाठी कराड दक्षिणच्या जनतेचं मतदान; पृथ्वीराज चव्हाण यांची प्रतिक्रिया
  3. महाराष्ट्रातील जनता संविधान वाचवण्याची लढाई ताकदीनं लढेल - पृथ्वीराज चव्हाण

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.