मुंबई- Mr and Mrs Mahi box office : राजकुमार राव आणि जान्हवी कपूर यांच्या मुख्य भूमिका असलेल्या 'मिस्टर अँड मिसेस माही' या स्पोर्ट्स ड्रामा चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर चांगली ओपनिंग केली आहे. हा चित्रपट 31 मे रोजी जगभरात प्रदर्शित झाला. राजकुमार राव आणि जान्हवी कपूर ही नवीन जोडी 'मिस्टर अँड मिसेस माही' या चित्रपटातून पहिल्यांदाच रुपेरी पडद्यावर दिसली आहे. करण जोहरच्या धर्मा प्रॉडक्शनच्या बॅनरखाली बनलेल्या 'मिस्टर अँड मिसेस माही' या चित्रपटानं पहिल्या दिवशी किती कमाई केली ते जाणून घेऊया.
'मिस्टर आणि मिसेस माही'चं ओपनिंग कलेक्शन
शरण शर्मा दिग्दर्शित 'मिस्टर अँड मिसेस माही' हा एक रोमँटिक स्पोर्ट्स ड्रामा चित्रपट आहे. या चित्रपटासाठी, पहिल्या दिवशी हिंदी पट्ट्यातील चित्रपटगृहांमध्ये 56.15 टक्के लोकांनी हजेरी लावली. या चित्रपटानं पहिल्याच दिवशी देशांतर्गत बॉक्स ऑफिसवर 6.85 कोटी रुपयांचं निव्वळ कलेक्शन केलं आहे. करण जोहरनं त्याच्या धर्मा प्रॉडक्शनच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवर चित्रपटाच्या पहिल्या दिवसाचा संग्रह शेअर केला आहे.
'मिस्टर आणि मिसेस माही' बद्दल
'मिस्टर अँड मिसेस माही' हा एक स्पोर्ट्स ड्रामा चित्रपट आहे. हा चित्रपट टीम इंडियाचा माजी कर्णधार एमएस धोनीच्या जीवनावर आधारित असल्याचं म्हटलं जात आहे, परंतु चित्रपटाचं कथानक कुठेही धोनीच्या जीवनाशी जुळत नाही. 40 कोटींच्या बजेटमध्ये बनलेल्या या चित्रपटानं चांगली ओपनिंग केली आहे. आता पाहायचं आहे की 'मिस्टर अँड मिसेस माही' पहिल्या वीकेंडला त्याच्या बजेटची अर्धी रक्कम बॉक्स ऑफिसवर जमा करु शकतो की नाही.
प्रेक्षकांच्या पसंतील उतरलेला 'मिस्टर अँड मिसेस माही'
बॉलिवूडमध्ये खरोखरच एक चांगला हलका-फुलका चित्रपट बनल्याच्या प्रतिक्रिया चित्रपट पाहिलेल्यांकडून ऐकायला मिळाल्या. यामधील जान्हवीचा अभिनय ग्लॅमर आणि तिच्या सौंदर्याच्या पलीकडचा असल्याचं प्रेक्षकांनी सांगितलं. संपूर्ण कुटुंबासह थिएटरमध्ये जाऊन हा चित्रपट पाहण्यासारखा असल्याची मतंही प्रेक्षकांनी नोंदवली आहेत.
हेही वाचा -
- जून महिन्यात ओटीटीवर मनोरंजनाचा धमाका, पाहा कोणत्या मालिका, चित्रपट होणार रिलीज - OTT attractions of June
- बिग बॉस ओटीटी 3 शोमध्ये अनिल कपूरची होस्ट बनून झकास एन्ट्री - Anil Kapoor
- जून महिन्यात रिलीज होणार 'कल्की 2898AD' ते 'चंदू चॅम्पियन' पर्यंत हे 10 चित्रपट - Movies releasing in June