मुंबई - Manoj Bajpayee News :अभिनेता मनोज बाजपेयीनं त्याच्या अभिनय कारकीर्दत 100हून अधिक चित्रपटांमधून अभिनय केला आहे. विविधांगी व्यक्तिरेखा आणि वैशिष्ट्यपूर्ण अभिनयासाठी ओळखला जाणाऱ्या मनोज बाजपेयीनं अलीकडेच त्याच्या 'सिर्फ एक बंदा काफी है' या चित्रपटासाठी मिळालेल्या भरभरून प्रेमासाठी चाहत्यांचे आभार मानले आहेत. 'सिर्फ एक बंदा काफी है' हा कोर्टरूम ड्रामा अनेकांना आवडला आहे. या चित्रपटाची कहाणी खऱ्या घटनेवर आधारित आहे. या चित्रपटात मनोज बाजपेयीनं वकिलाची भूमिका साकारली आहे.
'सिर्फ एक बंदा काफी है' कोर्टरूम ड्रामा : या चित्रपटामध्ये मनोज बाजपेयी हा कथित धर्मगुरुकडून अन्याय झालेल्या मुलींना न्याय देण्याचा प्रयत्न करतो. दरम्यान ओटीटी प्लॅटफॉर्मवर 'सिर्फ एक बंदा काफी है' रिलीज होऊन एक वर्षाहून अधिक काळ झाला आहे. हा कोर्टरूम ड्रामा 13 मे 2023 रोजी झी5वर प्रदर्शित झाला होता. अलीकडेच, एका मुलाखतीत मनोज बाजपेयीनं म्हटलं, "सिर्फ एक बंदा काफी है' या चित्रपटानं इतिहास रचला आहे. ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होऊन 1 वर्षाहून अधिक काळ झाला आहे. 1 अब्जहून अधिक लोकांनी हा ड्रामा पाहला आहे. मला खूप प्रेम आणि कौतुक मिळालं आहे."