महाराष्ट्र

maharashtra

'मंजुम्मल बॉईज'चे दिग्दर्शक चिदंबरम करणार हिंदी पदार्पण, चाहत्यांची उत्सुकता शिगेला - Manjummel Boys Director Chidambaram

Manjummel Boys Director Chidambaram : 'मंजुम्मल बॉईज'चे दिग्दर्शक चिदंबरम हिंदी चित्रपटसृष्टीत दिग्दर्शनात पदार्पण करण्यासाठी सज्ज आहेत. फँटम स्टुडिओनं त्यांना नव्या हिंदी चित्रपटासाठी करारबद्ध केलंय. या चित्रपटाचं कथानक गुलदस्त्यात असलं तरी चिदंबरम यांची कथाकथनाची हातोटी पाहता त्यांचे चाहते स्वागताची तयारी करत आहेत.

By ETV Bharat Marathi Team

Published : Jul 17, 2024, 4:15 PM IST

Published : Jul 17, 2024, 4:15 PM IST

Manjummel Boys Director Chidambaram
'मंजुम्मल बॉईज'चे दिग्दर्शक चिदंबरम ((ETV Bharat/Film poster))

मुंबई - Manjummel Boys Director Chidambaram : 'मंजुम्मल बॉईज' या मल्याळम भाषेतील चित्रपटानं सबंध भारतीयांना वेड लावली. अतिशय साधा विषयी यामध्ये ज्या प्रभावी पद्धतीनं मांडण्यात आला की देशभरातील गावोगावच्या तरुणाईला हा चित्रपट आपला वाटला. या चित्रपटामुळं दिग्दर्शक चिदंबरम सर्वांच्या नजरेत भरले. एक सर्जनशील दिग्दर्शक म्हणून त्यांची ओळख भारतीयांना झाली. 'मंजुम्मल बॉईज' हा चित्रपट डिस्ने हॉटस्टारवर हिंदी भाषेमध्ये डब होऊन प्रदर्शितच झाल्यानंतर त्याला प्रचंड लोकप्रियता मिळाली. आता याचे निर्माता, दिग्दर्शक चिदंबरम यांनी हिंदी भाषेत दिग्दर्शकीय पदार्पण करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. त्यांचा हा आगामी प्रकल्प फँटम स्टुडिओच्या सहकार्यानं पूर्ण होणार आहे.

चिदंबरम यांच्या 'मंजुम्मल बॉईज' चित्रपटानं केवळ रेकॉर्डच मोडीत काढले नाही तर त्याच्या बंदिस्त कथनानं समीक्षकांनाही खूश केले. 20 कोटींच्या बजेटमध्ये बनलेल्या या चित्रपटाने तब्बल 200 कोटी रुपयांची कमाई केली आणि 2024 मधील सर्वाधिक कमाई करणाऱ्या भारतीय चित्रपटांपैकी एक म्हणून त्याचे स्थान निश्चित केलं. या प्रभावी ट्रॅक रेकॉर्डसह चिदंबरम यांच्याकडून हिंदी भाषेतील चित्रपटाबाबतच्या अपेक्षा उंचावल्या जातील.

न्यूजवायरला त्याच्या हिंदी दिग्दर्शनाच्या पदार्पणाबद्दल बोलताना, चिदंबरम यांनी आधीच्या कामात 2021 मध्ये आलेल्या मल्याळम चित्रपट 'Jan.E.Man' चा समावेश आह. त्यांनी उत्साह व्यक्त करताना सांगितलं, "मंजुम्मल बॉईज नेहमीच खास राहिल, तरीही मी फँटम स्टुडिओबरोबर माझ्या पहिल्या चित्रपटासाठी करण्यासाठी सन्मानित आणि उत्साहित आहे. माझ्या कामाची व्याख्या करणाऱ्या कथाकथनाच्या आशयाशी खरं राहून नवीन कथा शोधण्याची आणि व्यापक प्रेक्षकांपर्यंत पोहोचण्याची ही एक संधी मला मिळाली आहे."

त्याच्या आगामी हिंदी चित्रपटाचे तपशील त्यांनी गुलदस्त्यात ठेवलं आहे. 'मंजुम्मल बॉईज' या चित्रपटाची निर्मिती, एका सत्य कथेवर आधारित आहे. कोडाईकनालच्या संस्मरणीय सहलीसाठी कोचीजवळील मंजुम्मल येथील मित्रांचा एक ग्रुप फिरायला जातो या कथेभोवती चित्रपट फिरतो. 22 फेब्रुवारी रोजी केरळ आणि तामिळनाडूमध्ये रिलीज झालेल्या या चित्रपटानं प्रेक्षक आणि समीक्षकांकडून मोठ्या प्रमाणावर प्रशंसा मिळवली आणि सध्या डिस्ने प्लस हॉटस्टारवर हा चित्रपट प्रवाहित होत आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details