मुंबई : बॉलिवूड अभिनेता राजकुमार राव पुन्हा एकदा मॅडॉक फिल्म्सच्या सहकार्यानं त्याच्या प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी सज्ज आहे. राजकुमार राव आणि दिनेश विजान यांनी एक अशी टाइम-लूप स्टोरी आणली आहे, जी पाहिल्यानंतर प्रेक्षकांना हसू आवरता येणार नाहीत. या विनोदी चित्रपटाचं नाव 'भूल चुक माफ' आहे. निर्मात्यांनी आज 18 फेब्रुवारी रोजी चित्रपटाचा पहिला टीझर रिलीज केला आहे, जो खूपच मनोरंजक आहे. मंगळवारी मॅडॉक फिल्म्सनं सोशल मीडियावर 'भूल चुक माफ'चा टीझर रिलीज करत कॅप्शनमध्ये पोस्टमध्ये लिहिलं, 'आज एकोणतीस वा दिवस आहे की तीस?' फरक फक्त एकोणतीस-तीस याबद्दलचा मुद्दा आहे. 10 एप्रिल रोजी थिएटरमध्ये 'भूल चुक माफ प्रदर्शित' होईल. दिनेश विजान प्रस्तुत करत आहेत राजकुमार राव आणि वामिका गब्बी स्टारर 'भूल चुक माफ' हा चित्रपट, करण शर्मा लिखित आणि दिग्दर्शित हा चित्रपटाचं आहे .'
'भूल चुक माफ'चा टीझर : 'भूल चुक माफ'चा टीझर बनारस (उत्तर प्रदेश)च्या प्रसिद्ध दशाश्वमेध घाटापासून सुरू होतो. यानंतर, टीझरमध्ये, राजकुमार राव आणि वामिका गब्बी यांचे कुटुंब दोघांच्या लग्नाच्या तारखेबद्दल चर्चा करतात, त्यानंतर त्यांच्या लग्नासाठी 30 तारीख निश्चित केली जाते. तसेच चित्रपटातील काही दृश्ये 'लव्ह आज कल' (2009) मधील 'चोर बाजारी' या प्रसिद्ध गाण्यावर दाखवली गेली आहे. टीझरमध्ये राजकुमार-वामिका त्यांच्या लग्नापूर्वीच्या खास क्षणांचा आनंद घेताना दिसत आहेत. तसेच लग्नाच्या विधींची एक झलक दाखवण्यात आली आहे. राजकुमाराचे कुटुंब हळदीचे विधी करतात. या दरम्यान, राजकुमार त्याच्या वामिकाला सांगतो, 'फक्त आजची रात्र आहे, उद्या तू माझी पत्नी होशील.' मग एक फुलदाणी वरून खाली पडते आणि संध्याकाळ होते. दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा राजकुमार उठतो, तेव्हा तो पाहतो की हळदीच्या समारंभाची पुन्हा तयारी सुरू होत आहे. तो त्याच्या आईला सांगतो की, त्याला पुन्हा हळदी लावली जात आहे. हळदीचा समारंभ पूर्ण झाला आहे. यावर त्याची आई म्हणते की, आज 29 तारीख आहे, उद्या 30 तारीख आहे. लग्ना उद्या आहे. यानंतर, फुलदाणी पुन्हा एकदा पडते आणि येथून टाइम-लूप क्रम सुरू होतो. आता राजकुमार राव या वेळेच्या चक्रातून बाहेर पडू शकेल का ? हे पाहणे मनोरंजक ठरेल.
राजकुमार राव आणि वामिका गब्बी दिसणार एकत्र : या चित्रपटाच्या माध्यामातून राजकुमार आणि वामिका पहिल्यांदाच स्क्रीन स्पेस शेअर करताना दिसणार आहेत. हा चित्रपट 10 एप्रिल रोजी रुपेरी पडद्यावर प्रदर्शित होणार आहे. 'भूल चुक माफ' हा मॅडॉकचा या वर्षीचा तिसरा चित्रपट आहे. यापूर्वी, या प्रॉडक्शन हाऊसनं 'स्काय फोर्स' आणि विकी कौशल-रश्मिका मंदान्ना यांचा ऐतिहासिक नाटक 'छावा' प्रदर्शित केला आहे. या दोन्ही चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर 100 कोटींपेक्षा जास्त कमाई केली आहे. राजकुमार राव-वामिका गब्बी स्टारर कॉमेडी 'भूल चुक माफ'लाही प्रेक्षकांकडून भरपूर प्रेम मिळेल अशी अपेक्षा सध्या केली जात आहे.
हेही वाचा :
- 'स्त्री 2' ओटीटीवर झळकणार : कधी आणि कुठे याबद्दल प्रेक्षकांची उत्सुकता ताणली... - Stree 2 OTT Release
- राजकुमार राव आणि तृप्ती डिमरी स्टारर 'विक्की विद्या का वो वाला व्हिडिओ'चं ट्रेलर रिलीज, हसा खळखळून - VVKWV trailer out
- अक्षय कुमार-वीर पहाडिया अभिनीत 'स्काय फोर्स' चित्रपटानं केली रिलीजच्या दुसऱ्या दिवशी जोरदार कमाई...