हैदराबाद : रिलायन्स जिओ 949 रुपयांच्या प्रीपेड रिचार्ज प्लॅनसह मोफत जिओहॉटस्टार सबस्क्रिप्शन ऑफर करत आहे. जिओचा प्रीपेड रिचार्ज प्लॅन जिओक्लाउड आणि जिओटीव्ही सारख्या निवडक इतर सेवांचा ॲक्सेस देखील देतो. नवीन स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म जिओसिनेमा आणि डिस्ने+ हॉटस्टार एकत्र करून तयार करण्यात आला होता.
विविध आंतरराष्ट्रीय कंटेंट
आता कंपनी हे दोन ओव्हर-द-टॉप (OTT) प्लॅटफॉर्मच्या कंटेंट एकत्र करतेय, तसंच विविध आंतरराष्ट्रीय स्टुडिओ आणि स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्मवरील कंटेंट होस्ट करतेय. वापरकर्ते कंटेंट पाहण्यासाठी मासिक आणि वार्षिक प्लॅनची सदस्यता घेऊ शकतात. तर जिओ सबस्क्राइबर्स आता विशिष्ट प्रीपेड रिचार्ज प्लॅन निवडून मोफत ॲक्सेस मिळवू शकतात.
प्रीपेड रिचार्जसह जिओहॉटस्टार सबस्क्रिप्शन
रिलायन्स जिओवरील 149 रुपयांच्या प्रीपेड रिचार्ज प्लॅनमध्ये आता 90 दिवसांसाठी जिओहॉटस्टारला जाहिरात-समर्थित सबस्क्रिप्शन ऑफर केलं आहे. या प्लॅनची वैधता 84 दिवसांची आहे आणि त्यात अमर्यादित व्हॉइस कॉल, दररोज 100 एसएमएस आणि दररोज 2 जीबी हाय-स्पीड 5 जी डेटा असे फायदे आहेत. दैनंदिन डेटा संपल्यानंतर, डाउनलोड स्पीड 64 केबीपीएस पर्यंत कमी केला जातो.
निवडक जिओ अॅप्सचा ॲक्सेस
जिओहॉटस्टार व्यतिरिक्त, प्रीपेड रिचार्ज प्लॅनमध्ये जिओक्लाउड आणि जिओटीव्ही सारख्या निवडक जिओ अॅप्सचा ॲक्सेस देखील मिळतो. जिओहॉटस्टारचा जाहिरात-समर्थित प्लॅन प्रति महिना 149 रुपयांपासून सुरू होतो. तो 720p रिझोल्यूशनमध्ये एका मोबाइल डिव्हाइसवर कंटेंट स्ट्रीमिंग देतो. टॉप-एंड जिओहॉटस्टार प्रीमियम प्लॅनची किंमत 299 रुपये प्रति महिना आणि 1,499 रुपये प्रति वर्ष आहे.
हे वाचलंत का :