मुंबई - Tamannaah Bhatia Vijay Varma :हिंदी चित्रपटसृष्टीतलं प्रसिद्ध प्रेमी युगुल विजय वर्मा आणि तमन्ना भाटिया पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. नुकतेच 'मर्डर मुबारक'च्या स्क्रिनिंगमध्ये ही जोडी एकत्र दिसली होती. या जोडप्यामधील प्रेम स्क्रिनिंगदरम्यान खुलून दिसले होते. विजय आणि तमन्नाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये दोघेही एकत्र आनंदात दिसत आहेत. आता हे सुंदर कपल मनीष मल्होत्रानं आयोजित केलेल्या पार्टीमध्ये एकत्र दिसले. विजय 'उल जलूल इश्क' या चित्रपटामध्ये दिसणार आहे. या चित्रपटाची निर्मिती फॅशन डिझायनर मनीष मल्होत्राने केली आहे. दरम्यान या पार्टीमध्ये विजय वर्मा आणि तमन्ना भाटिया व्यतिरिक्त 'उल जलूल इश्क' या चित्रपटाची स्टार कास्ट दिसली.
तमन्ना भाटियाचं लूक : पार्टीत अभिनेता नसीरुद्दीन शाह, चित्रपट निर्माता, दिग्दर्शक विशाल भारद्वाज यांचा देखील समावेश होता. या पार्टीत तमन्ना भाटियानं लाल रंगाचा सुंदर ड्रेस परिधान केला होता. याशिवाय विजयनं डेनिम जीन्स, पांढऱ्या शर्टवर बेज जॅकेट घातलं होतं. रत्ना पाठक यांनी लाल रंगाची साडी नेसली होती. याशिवाय नसीरुद्दीन यांनी पांढऱ्या पॅन्टबरोबर फ्लॉवर प्रिंटचा शर्ट घातला होता. 'उल जलूल इश्क' या चित्रपटाची रिलीज डेट अद्याप जाहीर झालेली नाही. 'उल जलूल इश्क' या चित्रपटात नसीरुद्दीन शाह, विजय वर्मा, फातिमा सना शेख आणि शरीब हाश्मी मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.