मुंबई - Maidaan Trailer Out: अभिनेता अजय देवगणची मुख्य भूमिका असलेल्या 'मैदान' चित्रपटाचा ट्रेलर अखेर प्रदर्शित झाला आहे. या स्पोर्ट्स ड्रामाचा टीझर अजय देवगणने गुरुवारी रिलीज केला होता. त्यामुळे या ट्रेलरला लोकांचा चांगला प्रतिसाद मिळाला आणि त्यामुळे चित्रपटाची चर्चा आणखी वाढली आहे.
अजयने ट्रेलर शेअर करताना लिहिले, "एक संघ ज्याने प्रत्येक पावलावर आपला वारसा निर्माण केला! एक माणूस ज्याने आपले आयुष्य फुटबॉलसाठी समर्पित केले आणि एक मैदान जिथे संपूर्ण जगाने हे सर्व पाहिले... भारतीय फुटबॉलचा सुवर्णकाळ जिवंत करत आहे!"
हा चित्रपट फुटबॉल खेळातील भारताच्या गौरवशाली भूतकाळात डोकावायला लावणारा चित्रपट आहेचित्रपट सत्य घटनांवर आधारित असलेल्या चित्रपटाच्या ट्रेलरने भारतीय फुटबॉलच्या महान वर्षांची थोडक्यात झलक दाखवली आहे. भारतासाठी 1952 ते 1962 पर्यंतचा काळ खूपच अभिमानास्पद होता. या काळात भारतीय फुटबॉल संघाने दोनदा ऑलिम्पिकसाठी पात्रता मिळवण्याची अद्भुत कामगिरी केली होती.
भारतीय क्रीडा इतिहासातील एक उल्लेखनीय काळ प्रदर्शित करताना फुटबॉलसाठी प्रेक्षकांचा उत्साह पुन्हा जागृत करण्याचं ध्येय चित्रपटाच्या टीमनं बाळगलं आहे. चित्रपटात अजयने प्रसिद्ध प्रशिक्षक सय्यद अब्दुल रहीम यांची भूमिका साकारली आहे. त्यांना भारतीय फुटबॉलचे प्रणेते मानले जाते. अजय व्यतिरिक्त या चित्रपटात रुद्रनील घोष, बंगाली अभिनेता प्रियमणी आणि गजराज राव हे देखील आहेत.