मुंबई - Mahesh Babu Voice Over For Mufasa :साऊथचा अभिनेता महेश बाबू आगामी डिस्ने चित्रपट 'मुफासा: द लायन किंग'च्या टीममध्ये सामील झाला आहे. यापूर्वी बॉलिवूड अभिनेता शाहरुख खाननं या चित्रपटाच्या हिंदी आवृत्तीसाठी मुफासाच्या पात्राला आवाज दिला आहे. आता तेलुगू आवृत्तीमध्ये महेश बाबूला मुफासासाठी आवाज देण्यासाठी निवडण्यात आलं आहे. डिस्ने इंडियानं या वृत्ताला दुजोरा दिला आहे. याशिवाय, 'मुफासा: द लायन किंग'च्या तेलुगू आवृत्तीबद्दल एक अपडेट समोर आली आहे. 21 ऑगस्ट रोजी वॉल्ट डिस्ने स्टुडिओ इंडियानं एक्सवर 'मुफासा: द लायन किंग'च्या तेलुगू आवृत्तीच्या ट्रेलरबद्दल खुलासा केला.
महेश बाबू देणार तेलुगू आवृत्तीमध्ये मुफासाला आवज : निर्मात्यांनी मुफासाचे पोस्टर तेलुगू व्हर्जनमध्ये पोस्ट केले. या पोस्टरबरोबर त्यांनी महेश बाबूच्या फोटोला देखील जोडले आहे. पोस्टर शेअर करताना निर्मात्यांनी या पोस्टच्या कॅप्शनमध्ये लिहिलं की, "जंगल लाइफच्या सर्वोच्च राजाला जिवंत करत आहे. सुपरस्टार महेशला तेलुगूमध्ये मुफासाचा आवाज म्हणून सादर करण्यास उत्सुक आहे. सोमवारी रिलीज होणारा 'मुफासा: द लायन किंग'चा तेलुगू ट्रेलर पाहा." दरम्यान बॉलिवूड सुपरस्टार शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान हा या चित्रपटात सिम्बाला आवाज देईल आणि अबराम खान छोट्या मुफासाला आवाज देत आहे. आता हा चित्रपट पाहण्यासाठी अनेकजण उत्सुक आहेत.