मुंबई - Nitish Bhardwaj Allegations on IAS Wife : महाभारतात भगवान कृष्णाची भूमिका साकारणारे अभिनेता नितीश भारद्वाज यांनी आपल्या पत्नीवर मानसिक छळ केल्याचा आरोप केला आहे. नितीश भारद्वाज यांनी 22 जानेवारीला अयोध्येतील राम मंदिराच्या उद्घाटन सोहळ्यालाही हजेरी लावली होती, त्यानंतर ते चर्चेत राहिले. आता नितीश यांनी आपल्या आयएएस पत्नीवर छळाचा केलाच्या आरोप केल्यानंतर ते पुन्हा एक चर्चेत आले आहेत. सध्या नितीश यांच्या पत्नी स्मिता गेट मध्य प्रदेश मानवाधिकार आयोगामध्ये अतिरिक्त मुख्य सचिव (ACS) म्हणून कार्यरत आहेत. नितीशनं पत्नीवर कारवाई करण्याची मागणीही केली आहे.
नितीश भारद्वाज यांनी केले पत्नीवर आरोप : नितीश भारद्वाज यांनी बुधवारी भोपाळचे पोलीस आयुक्त (सीपी) हरिनारायणाचारी मिश्रा यांच्याशी संपर्क साधला आणि त्यांच्या पत्नीविरोधात लेखी तक्रार केली. तक्रारीत नितीशनं म्हटलं आहे की, ''12 वर्षांच्या लग्नानंतर, त्यांनी पत्नी स्मिता गेट यांना 2019 मध्ये संमतीनं घटस्फोटासाठी मुंबई कौटुंबिक न्यायालयात अर्ज केला होता, यानंतर त्याची पत्नी ही त्याच्यापासून दूर राहते. याशिवाय त्यानं पत्नीवर आरोप केला की त्याला त्यांच्या जुळ्या मुली - देवयानी आणि शिवरंजनी यांना भेटू दिले नाही. भारद्वाज यांनी आपल्या तक्रारीत पुढे म्हटले आहे की, स्मिता मुलींना भेटू न देण्यासाठी त्याच्या शाळा बदलत राहते, त्यामुळे ते मानसिकदृष्ट्या अस्वस्थ झाले आहेत. घटस्फोट हा मृत्यूपेक्षाही अधिक वेदनादायी असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.