मुंबई - Janhvi Kapoor Birthday : अभिनेत्री जान्हवी कपूर 6 मार्च रोजी आपला 27 वा वाढदिवस साजरा आहे. या खास दिवशी तिला अनेकजण सोशल मीडियावर वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आहेत. दरम्यान जान्हवीला कथित बॉयफ्रेंड शिखर पहाडियानं या विशेष प्रसंगी एक सुंदर पोस्ट शेअर करून वाढदिवसाच्या रोमँटिक शैलीत शुभेच्छा दिल्या आहेत. आता या जोडप्याच्या नात्याबद्दलचा खुलासा झाला आहे. आज, 6 मार्च रोजी, शिखर पहाडियानं त्याच्या इंस्टाग्राम स्टोरीवर जान्हवी कपूरबरोबरचा दोन फोटो शेअर करून अनेकांना आश्चर्यचा धक्का दिला आहे. आता या जोडप्याचं नात जगजाहीर झालं आहे.
शिखर पहाडियानं जान्हवी कपूरला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा : व्हायरल होत असलेल्या फोटोमध्ये जान्हवी ही शिखरबरोबर आयफेल टॉवरसमोर उभे राहून त्याकडे पाहताना दिसत आहेत. या फोटोच्या कॅप्शनमध्ये शिखरनं लिहिलं, ''हॅपी बर्थडे'' आणि एक रेड हार्ट इमोजीसह शुभेच्छा दिल्या आहेत. फोटोमध्ये दोघेही ब्लॅक आउटफिटमध्ये दिसत आहेत. पुढील इंस्टाग्राम स्टोरीमध्ये शिखरनं जान्हवी कपूरचा पाळीव श्वानबरोबरचा फोटो पोस्ट केला आहे. यावर त्यानं कॅप्शनमध्ये लिहिलं, 'लव्ह फ्रॉम ऑल युअर बेबीज'. जान्हवी तिच्या पाळीव श्वानबरोबर कॅज्युअल आऊटफिटमध्ये बसलेली दिसत आहे. या फोटोमध्ये ती नो मेकअप लूकमध्ये आहे.