हैदराबाद New Recharge Plans 2025 : Jio आणि Airtel या दोघांनीही व्हॉइसन्ली प्लॅन सादर केले आहेत. या प्लॅनमधून रिचार्ज करणाऱ्या सबस्क्राइबर्सना फक्त कॉलिंग आणि एसएमएसचे फायदे मिळतील. त्यांना इंटरनेटचे कोणतेही फायदे मिळणार नाहीय. ट्रायनं दूरसंचार कंपन्यांना फक्त कॉलिंग आणि एसएमएस फायदे देणाऱ्या प्लॅनसह रिचार्ज करण्याचा पर्याय देण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार कंपन्यानी त्यांचे नविन प्लॅन जाहीर केले आहेत.
एअरटेल व्हॉइस ओन्ली रिचार्ज प्लॅन
भारती एअरटेलच्या नवीन प्लॅनची किंमत 499 रुपये आणि 1959 रुपये असून त्यांची वैधता अनुक्रमे 84 दिवस आणि 365 दिवस असणार आहे. यामध्ये अनुक्रमे 900 आणि 3600 एसएमएस तुम्हाला करता येतील. दोन्ही प्लॅनमध्ये तुम्हाला डेटा मिळणार नाहीय. परंतु सर्व नेटवर्कवर अमर्यादित कॉलिंग, मोफत हॅलोट्यून्स आणि अपोलो 24/7 सर्कल ॲक्सेस असे फायदे तीन महिन्यांसाठी मिळतील.
जिओ व्हॉइस ओन्ली रिचार्ज प्लॅन
रिलायन्स जिओनं वापरकर्त्यांना 458 आणि 1958 रुपयांच्या नवीन व्हॉइस ओन्ली प्लॅनसह रिचार्ज करण्याचा पर्याय उपलब्ध करून दिला आहे. हा प्लॅनमध्ये तुम्हाला अनुक्रमे 84 दिवस आणि 365 दिवसांची वैधता मिळेल. तसंच अनुक्रमे 1000 SMS आणि 3600 SMS पाठवण्याचा पर्याय देखील यात तुम्हाला मिळणार आहे. वापरकर्ते सर्व नेटवर्कवर अमर्यादित कॉल, जिओटीव्ही, जिओसिनेमा, जिओक्लाउडमध्ये प्रवेश मिळवू शकता.
कोणाचा प्लॅन स्वस्त
जर आपण रिलायन्स जिओ आणि भारती एअरटेलच्या नवीन प्लॅनची तुलना केली, तर दोन्ही प्लॅनवर समान फायदे मिळतात, मात्र, जिओचे व्हॉइस ओन्ली प्लॅन स्वस्त आहेत. जिओचा 84 दिवसांच्या वैधतेचा प्लॅन एअरटेलपेक्षा 41रुपये स्वस्त आहे आणि त्यात 100 अधिक एसएमएस देखील तुम्हाला मिळणार आहे. याशिवाय, 365 दिवसांच्या वैधतेसह जिओचा प्लॅन एअरटेलपेक्षा फक्त एक रुपया स्वस्त आहे. अशा परिस्थितीत, जिओकडून सर्वात स्वस्त व्हॉइस ओन्ली प्लॅन ऑफर केला जात आहे.
हे वाचलंत का :